पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला मिळते इतके उत्पन्न | Post office scheme in marathi

आजच्या घडीला गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. परिणामी पोस्ट ऑफिस देखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते. ज्यामधे सुरक्षितेबाबत हमी व मजबूत फायदे देखील दिला जातो.

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला मिळते इतके उत्पन्न | post office scheme in marathi

आपण आपल्या भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करत असतो जेणेकरून भविष्यात कोणतेही अडचण येणार नाही तसेच सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. आजच्या घडीला लोकांच्या गुंतवणूक भविष्यासाठी वरदान ठरणार आहे त्यामुळे पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. आजच्या घडीला प्रत्येक व्यक्तीला आपल्या पाल्याची भविष्य उज्वल करायचे आहे जेणेकरून भविष्यात पैशांची अडचण होऊ नये. भविष्यात पैशांची अडचण टाळण्यासाठी पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत मुलांचे खाते उघडले तर ही भरण्याचे सगळे टेन्शन मिटेल. पोस्ट ऑफिस ची पोस्ट ऑफिस एमआयएस (MIS) ही अशीच एक महत्त्वाची बचत योजना आहे. या योजनेत एखादा गुंतवणूक करून तुम्ही या योजनेमार्फत दर महिन्याला व्याजाचा स्वरूपात त्याच्या लाभ घेऊ शकता. विशेष म्हणजे या खात्यात अनेक फायदे आहेत.

एमआयएस (MIS) या बचत योजना खात्यात दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने देखील खाते उघडता येते. जर तुम्ही तुमच्या पाल्याच्या नावाने हे खाते उघडले तर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या शाळेच्या फिची चिंता भासणार नाही. पण खाते उघडण्यापूर्वी या योजनेविषयी सर्व माहिती जाणून घ्या.

जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असेल तर हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येते. या खात्याच्या अंतर्गत किमान 1000 किंवा 4.5 लाख रुपये पर्यंत जमा करता येतील. त्या खात्यांच्या योजनेअंतर्गत 6.6% व्याजदर आहे. जर तुमच्या पाल्याचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही तुमच्या पाल्याच्या नावाने खाते उघडू शकता. विशेष म्हणजे जर तुमच्या पाल्याचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल तर पालक हे खाते उघडू शकतात. तसेच या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षाची आहे. त्यानंतर ते खाते बंद केले जाऊ शकते.

जर आपले पाल्य दहा वर्षांचे असेल त्याप्रमाणे 2 लाख रुपये त्यांच्या नावावर गुंतवले तर महिन्याकाठी 6.6 व्याजदराने 1100 रुपये मिळतील. त्याप्रमाणे हे व्याज 5 वर्षात 660000रुपये असेल. तसेच शेवटी दोन लाख रुपये देखील परत केले जातील. जर तुम्ही पाच 4.5 लाख रुपये जमा केले तर, तुम्हाला दर महिन्याला 2500 रुपये मिळतील. विशेष म्हणजे या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटे किंवा संयुक्तपणे उडता येते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ