डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | pomegranate benefits in marathi

अत्यंत आकर्षक, गुणकारी व मधुर असे डाळिंब सर्वश्रेष्ठ फळांमधील एक फळ आहे. कठीण कवचाप्रमाणे साल असलेले डाळिंब लाल, सफेद अशा दोन प्रकारामध्ये आढळते.

डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | pomegranate benefits in marathi

गोड डाळिंबे तृषाशामक, उष्णताहारक व पित्तहारक असतात. डाळिंब पित्तशामक असल्याने त्यांचा पित्तविकारामध्ये फार उपयोग होतो. पित्तज्वर आलेल्या माणसाला डाळिंबाचा रस दिल्याने फायदा होतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णताही नाहीशी होते. ताज्या डाळिंबाच्या (pomegranate benefits in marathi) रसात खडीसाखर घालून प्यायल्याने पित्तप्रकोप शांत होतो.

  • अरुचीवर डाळिंबाचा (pomegranate) उपयोग होतो. आंबटगोड डाळिंबांचा रस दिवसातून थोडा थोडा असे 8-10 दिवस प्यायल्याने अरुची दूर होते व तोंडाला चव येते. तसेच सैंधव, मध व डाळिंबाचा रस एकत्र करून हे चाटण घेतल्याने सुद्धा अरुची दूर होते.
  • डाळिंबाच्या मुळाची साल उकळत्या पाण्यात घालून हे उकळलेले पाणी थंड झाल्यावर घोट-घोट प्यायल्याने पोटातल्या जंतांचे प्रमाण कमी होते.
  • डाळिंब (pomegranate) मूत्रदोषहारक, रुचकर, वात-पित्तशामक व उलटी बंद करणारे असते.
  • डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने नाकामधून रक्त पडण्याचे बंद होते. तसेच मूळव्याधींच्या त्रासामध्येही फायदा होतो.
  • गोड डाळिंब गरोदर स्त्रियांसाठी उत्तम समजले जाते. त्यामुळे अशक्तता दूर होऊन शरीरस्वास्थ सुधारते. हृदयासाठी व शरीरासाठी ते बलकारक ठरते.
  • डाळिंबाची साल पाण्यात उगाळून दिल्यास लहान मुलांची अतिसारापासून सुटका करता येते.
  • संग्रहणी झाली असता सुकलेल्या डाळिंबाची साल उगाळून त्यात पाणी घालून द्यावे किंवा डाळिंबाच्या रसात जायफळ, लवंग, सुंठेचे चूर्ण व मध घालून प्यावयास द्यावे.
  • डाळिंब रसाचे चाटण लहान मुलांना चाटवल्याने खोकला बरा होतो.
  • डाळिंबाचे मूळ उगाळून त्याचा लेप गजकर्ण व इसब यासारख्या त्वचा विकारामध्ये लावला असता उपयोग होतो..
  • अतिशय तहान लागली असता डाळिंबाचा रस प्यावा. तसेच खडीसाखरेतून हा रस घेतला असता छातीत दुखणे थांबते. आजारी माणसाला डाळिंब शक्तिकारक म्हणून उपयोगी पडते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ