अननस खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Pineapple benefits in marathi

अननस हे फणसाप्रमाणे वरून खरबरीत त्वचा असलेले परंतु, अंतर्यामी अतिशय गोड फळ आहे. परिपक्व अननस खाल्ल्याने शरीरामध्ये मधुर रस निर्माण होतो.

अननस खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Pineapple benefits in marathi

  • पिकलेले अननस पित्तशामक, उष्णताहारक, कृमिनाशक असते. उष्णतेचे विकार, तसेच उदरव्याधी, प्लीहावृद्धी, कावीळ, पांडुरोग यासारख्या विकारांमध्ये परिपक्व अननसाचा औषध म्हणून वापर केला जातो.
  • अननस रिकाम्या पोटी खाऊ नये. तसेच अपरिपक्व अननस पचण्यास जड, कफकारक व पित्तकारक असल्याने सहसा टाळावा.
  • साखरेच्या पाकामध्ये अननसाच्या गरातील फोडी टाकून त्याचा मुरांबा करावा. अत्यंत रुचकर अशा या मुरांब्यामुळे पित्तविकारात बराचसा फायदा झाल्याचे पाहावयास मिळते.
  • पोटात जंत झाले असता अननसाचे सेवन करावे. थोडा थोडा अननस आठ-दहा दिवस खाल्ला असता जंतांचा नाश होतो.
  • मध व अननसाचा रस एकत्र करून प्यायले असता घाम येऊन तापाचे प्रमाण कमी होते.
  • अननसाच्या रसामुळे श्रमपरिहार होतो व ताजेतवाने वाटू लागते.
  • अननसाच्या फोडी करून त्यावर मिरपूड व साखर घालून पित्तविकाराने पिडीत असलेल्यांना दिल्यास प्रभावी ठरू शकते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ