वृद्धपकाळात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी करा ‘या’ ठिकाणी योग्य गुंतवणूक | 5 Pension Schemes for Senior Citizens

चांगले सुखरूप भविष्य व्यतीत करण्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण गुंतवणूक करत असतो. गुंतवणूक आपल्यासाठी अजून कशी चांगल्या प्रकारे फायद्याची ठरेल तसेच आपला वृद्धपकाळ कोणत्याही आर्थिक समस्याविना पूर्ण करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी उज्वल भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करू शकता.

‘या’ ठिकाणी योग्य गुंतवणूक करा | 5 Pension Schemes for Senior Citizens Offered by the Government of India

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) या योजनेचा कालावधी अवघ्या 5 वर्षाचा आहे. जो योजनेच्या मदतीनंतर आणखी वाढीव तीन वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो. विशेष म्हणजे एखादा गुंतवणूकदार इच्छा असेल तर एकापेक्षा जास्त (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) या योजनेची खाती उघडू शकतो.

गुंतवणूकदाराची सर्व खात्यांची एकत्रित गुंतवणूक मर्यादा रुपये 15 लाख रुपये आहे. सध्याच्या घडीला वार्षिक व्याजदर 7.4% आहे. तीमाही देय आहे आणि पूर्णपणे करपात्र आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात SCSS मधील गुंतवणूक कलम 80c अंतर्गत करलाभ प्रदान करते. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याचीही मुभा आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)

PMVVY अर्थात प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केवळ एलआयसी (भारतीय आयुर्विमा महामंडळ) कडे उपलब्ध आहे. PMVVY ही 10 वर्षासाठी एकरकमी गुंतवणूक योजना आहे. यामध्ये मासिका, तीनहिने, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्न मिळवण्याचा पर्याय आहे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती PMVVY मध्ये जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये ( 30 लाख आपल्या जोडीदारासह) गुंतवणूक करू शकते.

चालू आर्थिक वर्ष 2022- 2023 मध्ये PMVVY अंतर्गत मासिक देय वार्षिक 7.40% खात्रीशीर पेन्शन उपलब्ध असेल. पेन्शनचा हा दर 31 मार्च 2023 पर्यंत खरेदी केलेल्या सर्व पॉलिसी साठी 10 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी देणे असेल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना अर्थात POMIS ही 5 वर्षाची गुंतवणूक आहे. ज्यामध्ये कमाल मर्यादा संयुक्त मालकी अंतर्गत नऊ लाख रुपये आणि एकल मालकी अंतर्गत 4.5 लाख रुपये आहे. व्याजदर प्रत्येक तिमाहीत निर्धारित केला जातो आणि सध्या तो 6.6% वर्षाप्रमाणे आहे. व्याजदर संपूर्ण कालावधीसाठी स्थिर राहतो.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत मिळालेले व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केले जाऊ शकते. आणि विशेष म्हणजे त्याच पोस्ट ऑफिसमधील आवर्ती ठेवीमध्ये निधी हस्तांतरित केला जाऊ शकतो.

बँक मुदत ठेव (FD)

सध्या FD अर्थात बँक मुदत ठेवीवर व्याजदर सुमारे 6.5% टक्के आहे. आणि ते वाढण्याची शक्यता. मुदत ठेवी मध्ये एफडी शिडी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवण्याऐवजी वेगवेगळ्या कालावधीत थोडी थोडी गुंतवणूक केली जाते.

जर तुमच्याकडे 5 लाख रुपये असतील तर एकाच वेळी गुंतवणूक करण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडी मध्ये गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या 5 एफडीचा मॅच्युरिटी कालावधी वेगळा असेल. अशाप्रकारे गुंतवणूक केल्यास पुरेशी रसद मिळेल ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर वार्षिक 0.5% टक्के अतिरिक्त व्याज मिळते. ज्यांना करा पासून संरक्षण करायचे असेल त्यांच्यासाठी 5 वर्षाची कर बचत बँक FD हा विचार करण्याचा पर्याय असू शकतो.

फ्लोटिंग रेट बचत रोखे

फ्लोटिंग रेट सेविंग बाँड, 2020 सात वर्षांच्या कालावधीसह येतो. या अवधीत व्याज वर्षातून दोनदा म्हणजे 1 जुलै आणि 1 जानेवारीला दिले जाते.

फ्लोटिंग रेट बचत रोखण्यासाठी व्याजदर NSC वरील व्याजदर अधीक 0.35% आहे. NSC च्या व्याज दरावर अवलंबून योजनेच्या कार्यकाळात व्याजदर बदलत राहतात. विशेष म्हणजे फ्लोटिंग रेट सेविंग बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही उच्च मर्यादा नाही.

Note – पेन्शन आर्थिक 2022-2023 मध्ये खरेदी केलेली प्रधानमंत्री वय वंदना योजना 10 वर्षांच्या पूर्ण पॉलिसी मुदतीसाठी वार्षिक 7.4 टक्के पेन्शन प्रदान करते. तसेच फ्लोटिंग रेट बचत रोखण्यासाठी व्याजदर NSC व्याज दर अधिक 0.35 % इतक्या प्रमाणात आहे. वरिष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूक कलम 80c अंतर्गत कर लाभ प्रदान करते.

Note 2 – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button