पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Papaya benefits in marathi

आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर, भाजी व सॅलड मार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक, वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते.

पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | papaya benefits in marathi

 • पोटाचे विकार, अपचन यांवर पपई (pawpaw) गुणकारी असते.
 • पपईच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदयविकारामध्ये उपयोगी असतो.
 • दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते, शरीराचे संवर्धन होते.
 • पपईचे दूध पाचक, जंतनाशक, उदररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते तसेच पपईच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते.
 • कच्च्या पपईची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांसाठी अतिशय वरदायिनी ठरते.
 • मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदररोग व हृदयरोग यावर पपईचे सेवन करणे हितावह ठरते.
 • पपईच्या रसामुळे अरुची दूर होते. आतड्यामध्ये साचलेल्या अन्नाचा नाश होतो, डोकेदुखी (अजीर्णामुळे) दूर होते. तसेच आंबट ढेकरा येणे बंद होते.

हे सुध्दा वाचा:नारळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

 • खरूज व गजकर्ण यांवर पपईचा चीक लावल्यास फायदा होतो.
 • कच्च्या पपईचा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात.
 • डेंग्यूसारख्या आजारामध्ये पपई (papaw) खाण्याचा सल्ला दिला जातो.
 • गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ