जायफळ खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Nutmeg health benefits in marathi

मित्रांनो मिठाई, श्रीखंड, बासुंदी आदी मिष्टान्नामध्ये जायफळाचा वापर केलेला आपण पाहतोच. जायफळाच्या झाडांना आलेली ही फळे पिकल्यावर फुटतात. त्यामधील गराला जायफळ (Nutmeg) म्हणतात. ह्या बियांवर लालसर काळपट रंगाचे जे जाळीदार वेष्टन असते त्याला जायपत्री म्हणतात. उत्तम प्रतीचे जायफळ मोठे, टणक व वजनदार असते. जायफळ तुपामध्ये ठेवल्यास दीर्घकाळापर्यंत टिकते.

जायफळ खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Nutmeg health benefits in marathi

  • जायफळाचे तेल अग्निप्रदीपक, उत्तेजक असून कफ, उलटी, खोकला, तहान व कृमी यांवर उपयोगी होते.
  • जायफळ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखी बरी होते.
  • जायफळाचे थोडेसे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्याने झोप चांगली लागते. तुपात जायफळ उगाळून मस्तकावर लेप लावल्यानेही झोप लागते.
  • तांदुळाच्या धुवणात जायफळ उगाळून ते पाणी प्यायल्याने उचकी लागणे, उलटी होणे यांवर गुण येतो. जायफळाचे दहा ग्रॅम चूर्ण गुळात कालवून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात. दर अर्ध्या-पाऊण तासाने एक गोळी कोमट पाण्याबरोबर घेतल्याने जुलाब थांबतात.
  • अतिसाराचा त्रास होत असताना जायफळ उगाळून त्याचा लेप बेंबीवर द्यावा. पोटात दुखणे बंद होते.
  • जायफळाचे तेल साखरेत घालून खाल्ल्यास पोटफुगी व पोट दुखणे बंद होते.
  • जायफळाच्या तेलात बुडवलेला कापसाचा गोळा दुखऱ्या दाताखाली ठेवल्याने
  • दातातील कीड मरते व दात दुखणे बंद होते.

हे सुध्दा वाचा: मिरची खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • जायफळाचे तेल व राईचे तेल एकत्र करून मालीश केले असता आखडलेले सांधे मोकळे होतात.
  • जायफळाचे चूर्ण तिळाच्या तेलात खलून ती पेस्ट लावल्यास व्रण भरून येतात.
  • संधिवातामध्ये जायपत्रीचे तेल चोळावे.
  • गुदद्वाराला सूज येऊन रक्त पडत असता त्या भागावर जायपत्रीचे तेल चोळावे. फायदा होतो.
  • खोबरेल तेलात जायपत्रीचे तेल मिसळून नियमितपणे केसांत लावल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
  • जायपत्री उगाळून त्याचा लेप कपाळावर लावला असता डोकेदुखी बंद होते.
  • जायफळ (Nutmeg) उगाळून दुधात घालून घेतले असता दूध स्वादिष्ट बनते.

जायफळ खाण्याचे नुकसान तुम्हाला माहित आहे का? |Nutmeg side effects in marathi

  • जायफळाचे अतिरेकी सेवन आरोग्यास अपायकारक ठरते. त्याचे मादक परिणाम दिसून येतात. चक्कर येणे, असंबद्ध बडबड वाढणे आदी लक्षणे दिसून येतात. उच्च रक्तदाब असलेल्या माणसांनी जायफळाचा वापर टाळावा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button