मित्रांनो स्मार्टफोन (smartphone) ही प्रत्येक युजर्सची मोठी गरज बनला आहे. मग तो युजर्स महाविद्यालयात जाणारा असो किंवा कार्यरत व्यावसायिक असो, स्मार्टफोनशिवाय प्रत्येक काम अपूर्णच आहे. अशा परिस्थितीत युजरची गरज लक्षात घेऊन प्रत्येक बजेटची उपकरणे बाजारात येतात.
Smartphone खरेदी करताना ‘या’ चुका कधीही करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावं लागलं |Never make these ‘mistakes’ while buying a smartphone
पण स्मार्टफोन खरेदी करताना अनेक वेळा युजरकडून चुका होत असतात. ज्यासाठी युजरला नंतर पश्चाताप करावा लागतो.आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत की स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी.
तुमच्या गरजेनुसार योग्य डिव्हाइस निवडा
स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी, जर तुम्हाला तुमच्या गरजेबद्दल माहिती असेल, तर तुम्ही योग्य डिव्हाइस निवडू शकता. वेगवेगळ्या युजर्ससाठी बाजारात वेगवेगळी उपकरणे ऑफर केली जातात.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल, तर मोठी स्क्रीन आणि चांगली कामगिरी तुमची गरज बनते. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर फोनच्या स्क्रीनपेक्षा कॅमेरा तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे.
किंमतीकडे पण लक्ष द्या
काळानुरूप फोन बदलणारे असेल तरी किंमतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कधी कधी एखादा महागडा स्मार्टफोनही हँग होण्यासारख्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेला स्मार्टफोन आधी व्यवस्थित तपासा. तसेच, एखादी नामांकित कंपनी असेल म्हणून लगेच मोबाईल घेऊ नका. त्याचे फीचर्स काय आहे ते नीट तपासून घ्या, आणि इतर फोन सोबत सुद्धा कम्पेअर करा.
हे सुध्दा वाचा:- फायबर ऑप्टिक आणि वायरलेस ब्रॉडबँड मध्ये फरक काय आहे? संपुर्ण माहिती
जाहिरात पाहून फोन खरेदी करू नका
मित्रांनो अनेक वेळा युजर जाहिरात पाहूनच नवीन फोन घेण्याचा विचार करतो. पण असे चांगले नाही. जाहिरातीमध्ये फोनची केवळ हायलाइट केलेली वैशिष्ट्ये दर्शविली जातात. कोणताही फोन खरेदी करण्यापूर्वी त्याचे सर्व पैलू तपासा. कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स आणि डिस्प्ले व्यतिरिक्त, इतर सर्व वैशिष्ट्ये देखील तपासले पाहिजे.
योग्य वेळी फोन खरेदी करा
नवीन फोन लॉन्च केल्यानंतर काही महागड्या किमतीतच तो ऑफर केला जातो. तुम्हाला फोन आवडला असेल तर योग्य वेळी खरेदी करा. मात्र, यासाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. अनेक प्रकारच्या डिस्काउंट ऑफर ऑनलाइन ऑफर केल्या जातात, याशिवाय सणासुदीच्या काळात तुम्ही खरेदी करू शकता.
Note- मित्रांनो तुम्हाला (Never make these ‘mistakes’ while buying a smartphone) ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.