मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? | Marathi language day information in marathi

प्रख्यात मराठी कवी, साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी 1912 रोजी कुसुमाग्रजांचा पुण्यात जन्म झाला. मराठी कवितेला कवी कुसुमाग्रज यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. तसेच मराठीला साहित्य क्षेत्रात विशेष स्थान निर्माण करुन देण्यात कुसुमाग्रजांचं योगदान मोलाचं आहे. कुसुमाग्रजांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला. पण शासकीय दस्ताऐवजांनुसार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून पहिल्यांदा नमूद करण्यात आली होती. त्यानुसार पुढे महाराष्ट्र सरकारने 21 जानेवारी 2013 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केला. काहीजण याच दिवसाला मराठी राजभाषा दिन असेही म्हणतात.

मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? | Marathi language day information in marathi

मराठी राजभाषा आणि गौरव दिन वेगवेगळे.. जी भाषा खूप मोठ्या प्रमाणात बोलली जाते त्या भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 347 नुसार राष्ट्रपतींना आहे. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याचवेळी राज्याच्या कारभाराची भाषा मराठीच असेल असे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. तेव्हापासून 1 मे हा दिवस मराठी राजभाषा म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारनेही मराठीच महाराष्ट्राची अधिकृत भाषा असेल असे जाहीर केले. सध्याच्या परिस्थितीत 27 फेब्रुवारीलाच मराठी राजभाषा दिन अनेक जण म्हणतात. पण तसे नसून 1 मे हाच अधिकृत मराठी राजभाषा दिन आहे. तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषेविषयी काही रंजक गोष्टी

  • मराठी भाषा इंडो युरोपीय भाषा कुळातील एक भाषा – मानली जाते. भारतातल्या प्रमुख 22 भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे.
  • मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. संस्कृतपासून या भाषेची निर्मिती झाली असं मानलं जातं. म्हणूनच संस्कृतची भगिनी मराठी असल्याचं म्हटलं जातं.
  • प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जात असली तरी गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगढ़, दमण, दीव, दादरा नगर हवेली, सुरत, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणीही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते.
  • मराठी मातृभाषा असलेल्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी आणि भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.
  • जगभरात 9 कोटी लोकं असे आहेत ज्यांची मातृभाषा मराठी आहे.
  • 1947 मध्ये स्वतंत्र भारताने मराठी भाषेला भारतीय संघाच्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. 2012 मध्ये यासाठी भाषा समितीची स्थापनाही करण्यात आली. तेव्हापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, ही मागणी केली जात आहे. यंदाही मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर चार हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींना पाठवण्यात आली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत असून, अद्यापही त्यावर ठोस निर्णय झालेला नाही.

मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या एक जनअभियान सुरु करण्यात आले आहे. मराठी भाषेसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे याचिका पाठवण्यात आली आहे. यावर्षी तरी अभिजात दर्जा मिळण्यावर शिक्कामोर्तब होईल, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून, येणाऱ्या पिढ्यांद्वारे मराठीचं माहात्म्य शतकानुशतकं अबाधित रहावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ