‘यशस्वी’ होण्यासाठी बनवा कामांची यादी? | Make a to-do list to succeed?

शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कारण अनेकांनी आजपर्यंत ध्येयपूर्ती करायची असेल तर टू डू लिस्ट, कामांची यादी किंवा चेकलिस्ट म्हणजेच प्राधान्यक्रमांची यादी तयार करा आणि त्यानुसार कामं करा, असंच तुम्हाला सांगितलं असेल. पण खरं तर टू डू लिस्ट बनवणं फारसं फायदेशीर नसल्याचंच अनेक संशोधनांमधून दिसून आलंय. या संशोधनांनुसार, टू डू लिस्ट तयार केलेले 41 टक्के लोकं ती अजिबातच फॉलो करत नाही आणि उर्वरित लोकं जमतील तितकीच फॉलो करतात. केवळ बनवायची म्हणून ही लिस्ट बनवली जाते आणि काही काळातच त्याचा विसर पडतो. मग यावर उपाय काय, टू डू लिस्टशिवाय इतर आपण काय करू शकतो हे आपण या पोस्ट मधुन पाहणार आहोत.

‘यशस्वी’ होण्यासाठी बनवा कामांची यादी? | Make a to-do list to succeed?

1. वेळेचा योग्य वापर

आत्ता लगेच काय करणं गरजेचं आहे, उद्या कोणती कामं केलेली चालतील, कोणती कामं अशी आहेत जी पुढच्या आठवड्यात, महिन्यात केली तरी चालणार आहे या सगळ्याचा समावेश टू डू लिस्ट मध्ये केलेला असतो. आपण आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी ही लिस्ट बनवतो पण ध्येय काही लगेच पूर्ण होणार नसल्याने त्या टू डू लिस्टचा वापरच करत नाही. त्यापेक्षा आपलं जे काही ध्येय असेल ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या हातात असलेल्या वेळेलाच महत्त्व द्यायचं. कारण जर आपण आजारी पडलो तर पुन्हा निरोगी होता येतं, पैसे खर्च केले तर ते पुन्हा कमावता येतात पण जर आपण वेळ वाया घालवला तर तो मात्र आपल्याला परत आणता येत नाही. म्हणूनच टू डू लिस्टपेक्षा वेळेचं नियोजन करणं शिकणं गरजेचं आहे. जगातले सगळे यशस्वी माणसं ध्येय पूर्ण करण्यासाठी याच पद्धतीचा वापर करतात. प्रत्येक सेकंद, मिनिट आपण कुठे खर्च करत आहोत याबाबत ते प्रचंड जागृत असतात.

2. महत्त्वाचं काम ओळखा

टू डू लिस्टमध्ये आपण आज, उद्या किंवा परवा असे कामांचे प्राधान्यक्रम ठरवतो. पण त्यामुळे आजचं काम उद्या, उद्याचं परवा करण्याची सवय लागण्याचा धोका असतो. ध्येयासाठी ठरवलेल्या आवश्यक गोष्टीही पुढे ढकलण्याची सवय लागण्याची शक्यता असते आणि यामुळे ध्येय पूर्ण होणंही लांबच राहतं. यापेक्षा आत्ता या क्षणी जे काम महत्त्वाचं वाटतंय ते लगेचच पूर्ण करा. जगातल्या कोणत्याही यशस्वी माणसाला आपण त्याच्या यशाचं रहस्य विचारलं तर कोणीही आपल्याला टू डू लिस्ट बनवा असं सांगत नाही. महत्त्वाची कामं लगेचच पूर्ण करण्याबद्दल मात्र ते ठामपणे सांगतात. ज्या कामाला 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो ती तर अजिबातच पुढे ढकलू नका.

3. सोबत डायरी ठेवण्याचे फायदे

तुम्हाला जे काही सुचेल ते लगेच लिहून काढा. अनेकदा आपल्या मनात वेगवेगळ्या कल्पना येत असतात. त्या कल्पना महत्त्वाच्या असल्या तरी आपण त्या काही वेळाने विसरुन जातो. पण जर आपण त्या वेळोवेळी लिहून काढल्या तर व्यवस्थित विचार करुन त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला मदत होते. महत्त्वाच्या नोंदी त्या त्या वेळीच काढून ठेवण्याची सवय लागल्याने महत्त्वाची कामंही आपण विसरत नाही. त्यामुळे नोटबुक किंवा डायरी सोबत ठेवण्याची सवय लावाच.

4. मोबाईलचे नोटिफिकेशन बंद करा

सोशल मीडिया, मोबाईलचा वापर मर्यादित करा. ज्या ॲप्समध्ये आपला उगाचच वेळ वाया जातो त्याचे नोटिफिकेशन्स बंद करा. सोशल मीडियावर आपण लोकांचं लक्ष वेधण्यासाठी फोटोज टाकतो. त्यात काही गैर नाही. परंतु, त्यामुळे आपलं लक्ष आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे तिकडून विचलित होतं. जे फोटो आपण टाकले आहेत त्यावर कोणाची प्रतिक्रिया आली तर आपण आपली कामं सोडून त्या फोटोकडे, प्रतिक्रियेकडे वळतो. हे ध्येयपूर्तीच्या दृष्टीने योग्य नाही.

5. या गोष्टींना नाही म्हणा

तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी जे जे काही आड येईल त्या सगळ्याला स्पष्टपणे तुम्हाला नाही म्हणता आलंच पाहिजे. जी कृती करुन आपल्या ध्येयाला काहीही फायदा नाही त्यापासून लगेच दूर होता आलं पाहिजे. यासाठी मात्र कमालीचं स्वनियंत्रण असणं आवश्यक आहे. हे नियंत्रण तुम्ही प्राप्त केलं की कोणत्याही गोष्टीला नकार देताना तुम्हाला संकोच वाटणार नाही.6.

6. तुमच्यातल्या शक्तिशाली गुण ओळखा

आपल्या प्रत्येकात विशिष्ट गुण असतात. कोणात तत्परता असते, तर कोणात संयम असतो. एखाद्याला पूर्ण गुणवत्तेने काम पूर्ण करता येत असतं, तर दुसऱ्या कोणात चिकित्सक वृत्तीने काम जाणून घेत ते करायचं असतं. व्यक्तीनुसार हे गुण बदलत असतात. आपल्यात असा कोणता वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्या गुणाला केंद्रस्थानी करुन यशाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत रहायचं.

7. सकाळी लवकर उठा

सकाळी लवकर उठल्यानंतर एक तासात जितकी तुमची कामाची उत्पादकता असते तितकी दिवसभर नसते, असं यशस्वी लोकं सांगतात. मन आणि शरीराला नवी उर्जा प्राप्त झालेली असते. मेंदूचा थकवा नाहीसा झालेला असतो. हा ताजेपणाच आपल्याकडून चांगलं काम घडवतो.

हे सगळे मुद्दे टू डू लिस्ट बनवण्यापेक्षा अधिक प्रभावी आहेत. कोणत्याही लिस्ट / यादीमध्ये न अडकता वेळेला महत्त्व देऊन आपण कामं पूर्ण केली तर आश्चर्यकारक परिणाम आपल्यालाच दिसून येतील. त्यामुळे टू डू लिस्ट बनवणं सोडा आणि या लेखातल्या मुद्द्यांचा अवलंब करुन ध्येयपूर्तीच्या दिशेने पाऊल टाका.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button