पिंपळमूळ (long pepper) तिखट, उष्ण, रुक्ष, पित्तकारक असते. कफ वायू धरणे, कृमी, श्वास लागणे यांवर त्याचा फायदा होतो.
पिंपळमूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |long pepper benefits in marathi
- पिंपळमूळ मधामध्ये खलवून चाटून खावे व त्यावर गाईचे दूध गरम करून प्यायल्याने विषमज्वर बरा होतो.
- पिंपळमूळ थंड पाण्यात उगाळून त्यात पाणी घालून प्यावे. नारू बरा होतो.
- पिंपळमूळाचे चूर्ण व गूळ खाऊन त्यावर गरम दूध प्यायल्याने झोप चांगली लागते.
- पिंपळमूळाचे चूर्ण व साखर रोज सकाळी घेतल्याने आम्लपित्त बरे होते.
हे सुध्दा वाचा:– जायफळ खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- पिंपळमूळ (long pepper) व बेहडा यांचे चूर्ण सुंठेबरोबर मधात कालवून चाटवल्याने खोकला बरा होतो.
- अपचनाचा त्रास होत असल्यास पाव चमचा पिंपळीपूड मधातून खावी.
- अंगदुखी व सांधेदुखीमध्ये पिंपळी उगाळून त्याचा लेप करावा.
- रक्तपित्त या विकारामध्ये पिंपळी मधातून चाटवावी.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.