मित्रांनो एक काळ असा होता की, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात द्विशतक करणे हे स्वप्नासारखे होते. पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावर सर्वाधिक 194 धावांचा विक्रम सलग 17 वर्षे कायम होता. पण 16 डिसेंबर 1997 रोजी डेन्मार्कविरुद्ध 229* धावा करणारी ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क ही पहिली क्रिकेटपटू होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. हा विक्रम 2010 पर्यंत कोणत्याही पुरुष खेळाडूच्या आवाक्याबाहेर होता. अखेर भारताच्या सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये हा विक्रम मोडला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारे खेळाडू तुम्हाला माहित आहे का? |list of double centuries in odi cricket in marathi
आतापर्यंत 12 क्रिकेटपटूंनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 द्विशतके झळकावली आहेत ज्यात 5 भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. म्हणजेच या 12 द्विशतकांपैकी फक्त भारतीय फलंदाजांनी 7 शतके केली आहेत. संपूर्ण क्रिकेट विश्वातील हा एक अनोखा विक्रम आहे. आज आपण या पोस्ट मध्ये जाणुन घेणार आहोत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारे कोण कोणते खेळाडू आहेत?
द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी खालील प्रमाणे आहे | List of Double centuries in ODI cricket
खेळाडू | धावा | प्रतिस्पर्धी संघ/वर्ष |
रोहित शर्मा (IND) | 264 (सर्वोच्च) | श्रीलंका, 2014 |
मार्टिन गुप्टिल (NZ) | 237* | वेस्ट इंडिज, मार्च 2015 |
अमेलिया केर (NZ) | 232* | आयर्लंड, जून 2018 |
बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) | 229*(पहिली महिला खेळाडू) | डेन्मार्क, डिसेंबर 1997 |
वीरेंद्र सेहवाग (IND) | 219 | वेस्ट इंडिज, डिसेंबर 2011 |
ख्रिस गेल (WI) | 215 (सर्वात वेगवान) | झिम्बाब्वे, फेब्रुवारी 2015 |
फखर जमान (PAK) | 210* | झिम्बाब्वे, जुलै 2018 |
ईशान किशन (IND) | 210 | बांगलादेश, डिसेंबर 2022 |
रोहित शर्मा (IND) | 209 | ऑस्ट्रेलिया, नोव्हेंबर 2013 |
रोहित शर्मा (IND) | 208* | श्रीलंका, डिसेंबर 2017 |
शुभमन गिल (IND) | 208 | न्यूझीलंड, जानेवारी 2023 |
सचिन तेंडुलकर (IND) | 200* (पहिला पुरुष खेळाडू) | दक्षिण आफ्रिका, फेब्रुवारी 2010 |
एकदिवसीय सामन्यात शतके आणि द्विशतकांचे विक्रम
- एकदिवसीय सामन्यातील पहिले अर्धशतक जॉन एडरिच (इंग्लंड) ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याने 5 जानेवारी 1971 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 82 धावा केल्या.
- डेनिस एमिस (इंग्लंड), एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू होता. त्याने 24 ऑगस्ट 1972 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे इतिहासातील पहिले शतक (103) रन झळकावले.
- 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक (200*) करणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा पहिला पुरुष क्रिकेटपटू होता.
- एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या रोहित शर्माने (Rohit Sharma) केली. 13 नोव्हेंबर 2014 रोजी, रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या (264 धावा) केली.
- ODI मध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. ख्रिस गेलने केवळ 138 चेंडूत 200 धावा केल्या आहेत, तर सेहवागने 140 चेंडूत ही कामगिरी केली आहे.
- व्हिव्हियन रिचर्ड्स हा 1984 मध्ये वनडेमध्ये 180 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू होता. पण हा विक्रम गॅरी कर्स्टनने मोडला ज्याने 16 फेब्रुवारी 1996 रोजी यूएईविरुद्ध 188* धावा केल्या.
- सईद अन्वर (पाकिस्तान) हा एकदिवसीय सामन्यांमध्ये 190 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू होता. अन्वरने 21 मे 1997 रोजी भारताविरुद्ध 194 धावा केल्या होत्या.
हे सुध्दा वाचा:- अशा प्रकारे तुम्ही IPL 2023 घरी बसून मोफत पाहू शकता, फक्त या स्टेप्स फॉलो करा
हा विक्रम ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्कने मोडला, ज्याने डिसेंबर 1997 मध्ये मुंबईतील एमआयजी क्लब मैदानावर डेन्मार्कविरुद्ध नाबाद 229 धावांची खेळी केली.
मित्रांनो तर ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्व द्विशतकांची यादी झळकवणाऱ्यांची यादी होती. नजीकच्या काळात भारतीय फलंदाजांकडून आणखी द्विशतके झळकावली जातील अशी आशा आहे. येणाऱ्या काळात ही कामगिरी कोण करेल असं वाटतं, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.