आपन आपल्या घरातील प्रत्येक वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत असतो. त्याचप्रमाणे फ्रिजही ठराविक काळाने स्वच्छ करायला हवे. फ्रिज स्वच्छ केले नाही तर त्यामधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. शिवाय त्यामधील पदार्थ लवकर खराब होतात. त्यामूळे नियमितपणे फ्रिजची सफाई करणे गरजेचे आहे.
फ्रिज स्वच्छ करण्याची पद्धती जाणुन घ्या |Learn how to clean a fridge in marathi
- दोन आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रिज स्वच्छ करायला हवा.
- स्वच्छ करण्यापूर्वी फ्रिज बंद करून घ्यावे व त्यातील खराब किंवा नको असलेले पदार्थ काढून टाकावेत.
- डी. फ्रॉस्ट करावे, बेसवर एक जाड पेपर टाकावा. जेणेकरून खराब किंवा नको असलेले पदार्थ काढून टाकावेत.
- लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून वापरल्यास फ्रीजमध्ये दुर्गंधी येणार नाही.
- दही किंवा दूध जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्याने वास पसरतो अशावेळी वाटीत चुना घेऊन तो ठेवावा.
- कॉफी बीन्स एका वाटीत घेऊन फ्रीजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी निघून जाते.
- फ्री स्वच्छ करताना खाण्याचा सोडा आणि पाणी एकत्र करून फ्रिज स्वच्छ करावे.
- खाण्याचा सोडा ठेवल्यामुळे त्यामधील दुर्गंधी निघून जाते.
- फ्रिजमध्ये लिंबू किंवा संत्र्यांचा साली कापून ठेवल्याने दुर्गंधी शोषली जाते.
- फ्रीजच्या दारात रबरी गास्केटला टेलकम पावडर लावून ते कोरड्या कपड्याने पुसून घ्यावं.
- फ्रिज नेहमी कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.