हरूनही तो जिंकला होता…एकदा नक्की वाचा

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला मिळणे आणि त्यात यशस्वी होणे, पदक मिळविणे ही त्या खेळाडूच्या आयुष्यातील एक मोलाची घटना मानली जाते. अशा संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक स्पर्धक करीत असतो. जिंकणे ही एक घटना आहे, तर जेता होणे हे एक चैतन्य आहे. आयुष्यात घटनांना मर्यादा असतात; परंतु चैतन्य मात्र अमर्याद असते.

घटनेपेक्षा चैतन्य मोलाचे असते आणि हे चैतन्यच माणसाच्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन आपले आयुष्य उन्नत बनवते. जिंकण्यापेक्षा जेता ठरणेच अधिक उपकारक नाही का? यावरच आधारित एक गोष्ट किंवा रियल लाईफ स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत.

हरूनही तो जिंकला होता…| Lawrence lemieux motivational story in marathi

1818 साली सेउल येथील ऑलिम्पिकमध्ये एका प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा मागोवा घेऊ. शिडांच्या बोटींची शर्यत सुरू झाली. लॉरेन्स लेमी (Lawrence Lemieux) यांनी यात भाग घेतला होता आणि सुवर्णपदक मिळविण्याची क्षमता ते बाळगून होते.

स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक सहभागी स्पर्धक आपापली बोट पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. स्पर्धा मध्यावर आली होती. वारा प्रचंड वेगाने वाहत होता. त्याचा सामना करणे सर्वच स्पर्धकांना अवघड जात होते. लॉरेन्स दुसऱ्या क्रमांकावर होते. मागील अनुभवाचा विचार केला तर ते कधीही पहिल्या क्रमांकावर येऊ शकत होते. तेवढ्यात एका स्पर्धकाची बोट उलटली. तो स्पर्धक आपला जीव वाचविण्यासाठी ती बोट सरळ करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीत होता; परंतु त्यात त्याला यश मिळत नव्हतं.

स्पर्धा सुरूच होती. ही गोष्ट लॉरेन्सच्या लक्षात आली. या संकटकाळी मदत करणारी बोट जवळपास कोठेच दिसत नव्हती. हे बघून लॉरेन्सने आपल्या बुडणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. स्पर्धा सोडून त्याने आपली बोट आपल्याच बुडणाऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने वळविली. सारे जग ‘घटना पाहत होते. स्पर्धा जिंकण्याच्या आकांक्षेपेक्षा त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा जीव वाचविण्यास प्राधान्य दिले.

त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवून लॉरेन्स लेमी परत आपल्या स्पर्धेत दाखल झाले. त्यांना ही स्पर्धा जिंकता आली नाही. तरीही ते ‘जेता’ ठरले. संपूर्ण जगाने लॉरेन्स लेमींनी दाखविलेल्या या चैतन्याचा गौरव केला. मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर भेटूया पुढच्या पोस्टमध्ये.

Note:- तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button