एका छोट्या सायकल दुकानापासून ते मोठा बिझनेस मॅन होण्यापर्यंतचा प्रवास, म्हणजेच लक्ष्मणराव किर्लोस्कर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपती व कारखानदार, किर्लोस्कर उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक आहे.आज आपण यांच्या जीवना बद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. म्हणून ओळखले जाणारे
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जीवन प्रवास | Lakshman rao kirloskar information in marathi
नाव | लक्ष्मणराव किर्लोस्कर |
जन्म | 20 जून 1869 |
जन्मस्थान | कर्नाटक,गुर्लहोसूर |
वडिलांचे नाव | काशिनाथ किर्लोस्कर |
लक्ष्मणराव यांचा जन्म 20 जून 1969 रोजी कर्नाटक येथील गुर्लहोसूर या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे धारवाड व कलादगी या ठिकाणी झाले.
त्यांनी पुढे चित्रकलेच्या अभ्यासासाठी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टस येथे प्रवेश घेतला.आणि त्या ठिकाणी दोन वर्षें अभ्यासही केला.
पण त्यांच्या अभ्यासात सुद्धा मन लागत नव्हते त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘जिजामाता संस्थेत’ अध्यापक म्हणून नोकरी केली.
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या करिअर बद्दल
त्यांना एखादी वस्तू खोलून, पुन्हा जोडण्याची खूप आवड होती. त्यामुळे ते केवळ शिक्षकी पेशात रमले नाहीत. त्यांनी 1887 मध्ये मुंबईतून सायकली खरेदी करून त्या बेळगावमध्ये रामण्णा यांच्या मदतीने विकण्यास सुरूवात केली.
त्यांनी इंग्लंडच्या सगळ्यात मोठा सायकल उत्पादक कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या सोबत करार केला. त्यांनी भावासोबत मिळून ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ या कंपनीची स्थापन केली. त्यांनी काही वर्षें विविध उद्योग केले. परदेशातून पवनचक्क्या आणूनही विकल्या. ते लोकांना सायकल चालवण्यास शिकवायचे. त्यांनी लाकडाचे खिडक्या आणि दरवाजे करून विकण्यास सुरुवात केली.
त्यांनी पहिले आपल्या देशाचा विचार केला
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामात येतील असे यंत्राने बनवण्याचे ठरवले. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नसल्याने आणि तो वाया जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.त्यातून त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी पहिले यंत्र बनवले हे यंत्र होते कडबा कापण्याचे. जनावरांच्या चाऱ्यातून बुडखा वेगळा करणे आणि चाऱ्याचे बारीक तुकडे करून ते जनावरांपुढे टाकणे सोपे झाले. ते यंत्र लोकांच्या पसंतीस उतरले.
त्यांनी स्वत:ची कार्यशाळा उभारली. त्यांनी लोखंडाचे ओतीव नांगर बनवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जागा व भांडवल या सर्वांची गरज भासू लागली. पण त्यांनी हार मानली नाही. औंध संस्थानने त्यांना 10 हजार रूपये आणि 32 एकर जमीन दिली. ती जागा म्हणजे संस्थानातील कुंडल या गावाजवळील एक पडीत जमीन होती. लक्ष्मणरावांनी त्यांचा उद्योग त्या जमिनीवर उभा केला. त्यांना अनेक अडचणी आल्या तरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी एक मोठे साम्राज्य निर्माण केलं. आज तो परिसर किर्लोस्करवाडी म्हणून ओळखला जातो. ‘उद्यम नगरी’ किर्लास्कर वाडी!
सामाजिक कार्याबद्दल
त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी माध्यमिक शाळा उघडल्या. त्या मुलांसाठी खेळण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून त्यांनी क्रिकेट क्लब गोल्फ क्लब टेनिस कोर्ट पोहण्याचा तलाव अशा अनेक सुविधा या भागात त्यांनी सुरू केल्या.किर्लोस्करांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना तेथे राहणे सोयीचे व्हावे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ही सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली. खरंतर बघायला गेले तर यांच्या बद्दल जेवढे सांगितले तेवढं कमीच आहे.
Note: जर तुमच्याकडे Lakshman rao kirloskar biography in marathi मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Lakshman rao kirloskar information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि twitter वर Share करू शकता.