नवीन किंवा जुनी कार खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा |Keep these things in mind before buying a new or used car

मित्रांनो भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठ हे जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार आहे. आपल्या उद्योगात भारतीय आणि विदेशी दोन्ही कंपन्या आहेत. ज्यामुळे लोकांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची जुनी कार विकायची असेल तर जुन्या कारची बाजारपेठ (second hand car) चांगली आहे. पण जर तुम्ही तुमची कार विकत असाल तर तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर नुकसान सहन करावे लागले.

नवीन किंवा जुनी कार खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा |Keep these things in mind before buying a new or used car

प्रथम आपल्या गरजा ओळखा

जर तुम्हाला स्वतःसाठी कार घ्यायची असेल तर तुम्हाला ती का हवी आहे याचा अभ्यास नक्की करा. सेकंड हँड कार (second hand car) घेण्यापूर्वी कारची स्थिती कशी आहे ते पहा. जेणेकरून ती घेतल्यावर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

तुमचं बजेट सेट करा

मित्रांनो तुमचं कार घ्यायचं असं ठरलं की, मग तुमचे बजेटही ठरवा. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी बजेट ठरवावे जेणेकरुन नंतर तुम्हाला त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा की कारची किंमत तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 40% पेक्षा जास्त नसावी किंवा कारवरील EMI रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 20% पेक्षा जास्त नसावी.

ऑर्फसकडे काळजीपूर्वक लक्ष द्या

कार घेण्यापूर्वी आपल्याला डीलरकडून विविध ऑफर्सबद्दल सांगितले जाते, परंतु तुम्ही ते काळजीपूर्वक तपासले पाहिजे जेणेकरून तुम्ही नंतर कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये. प्रथम, विनामूल्य ॲक्सेसरीजच्या किमतींकडे लक्ष द्या, जे सहसा डीलरशिपद्वारे वाढवली जातात.

हे सुद्धा वाचा: Smart RC Card म्हणजे काय? पेपर आरसीपेक्षा किती वेगळे आहे, ते बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी

भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लोक सीएनजी किंवा इलेक्ट्रिककडे वळत आहेत. म्हणून कार खरेदी करण्यापूर्वी, पेट्रोल, सीएनजी किंवा डिझेल कार आपल्यासाठी सर्वोत्तम आहे की नाही हे एकदा तपासा. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सूट होईल अशी कार खरेदी करा.

कागदपत्रे नक्की तपासा

जर तुम्ही स्वतःसाठी सेकंड हँड कार (second hand car) घेण्याचा विचार करत असाल तर कारची कागदपत्रे तुमच्याकडे आहेत याची नोंद घ्यावी, कारच्या कागदपत्रांशिवाय कोणताही व्यवहार करू नये. मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे तर नक्की शेअर करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button