जांभूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Java plum benefits in marathi

बाहेरून काळपट आतून जांभळट रंगांची ‘जांभळे’ परिपक्व झाल्यावर अत्यंत मधुर लागतात. जांभळे सर्वत्र अत्यंत आवडीने खाल्ली जातात. जांभळाचे सरबतही केले जाते. मधुमेह या विकारावर जांभळाचा उपयोग होतो.

जांभूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Java plum benefits in marathi

 • जांभूळ अनेक विकारांवर उपयोगी पडते. जांभळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभळांचे सेवन उपयोगी ठरते.जांभूळ पचण्यास जड असते.
 • विंचवाच्या दंशावर जांभळाच्या पानांचा रस चोळला जातो.
 • उलटीवाटे पित्त निघून जाण्यासाठी जांभळाच्या ताज्या सालीचा रस दुधातून घ्यावा म्हणजे पित्त लगेचच बाहेर पडते.
 • जांभळाच्या नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते. रक्तातील लालसरपणा वाढतो.हृदयासाठीही ती उपयोगी असतात.
 • जांभळाच्या आसवामुळे मधुमेह, अतिसार व संग्रहणी यांमध्ये फायदा होतो. जांभळातल्या तुरटपणाचा गुण मधुमेहामध्ये फायदेशीर ठरतो. जांभळाची साल पाचक व जंतुनाशक असते. या सालीचा उकाळा करून प्यायला असता संग्रहणी, अतिसार व मुरड्यावर उपयोग होतो.
 • जांभळांच्या बियांचे चूर्ण मधुमेही व्यक्तींनी रोजच्या आहारात ठेवल्याने रुग्णांना फायदा दिसून येतो.
 • जांभळाचे बी पाण्यात उगाळून घामोळ्यावर लावले असता घामोळे कमी होते.
 • जांभळामुळे यकृत कार्यक्षम होते. त्यामुळे यकृताच्या विकारात फायदा होतो.
 • पिकलेली जांभळे खाल्ल्याने पित्तामुळे होणारे जुलाब बंद होतात.
 • जांभळाच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते.
 • जांभळाच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांना आलेली सूज नाहीशी होऊन दात बळकट होतात व घशाची सूजही उतरते.
 • जांभळे रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत. जांभळे वातकारक असतात यास्तव वातविकारग्रस्त माणसांनी याचे सेवन करू नये. ज्यांना वारंवार उलट्यांचा त्रास होत असेल, बाळंतपणातून उठलेल्या स्त्रियांनी, ज्यांच्या शरीरावर सूज आलेली आहे अशा लोकांनी जांभळे खाऊ नयेत.
 • पिकलेली जांभळे वाळवून केलेली चमचाभर पूड पाण्याबरोबर घ्यावी. असे दररोज केल्याने काही दिवसातच लघवीतून साखर जाणे बंद होते.
 • जांभळांवर नेहमी मीठ टाकून खावे. जांभळांचे अतिरेकी सेवन केले असता छाती भरल्यासारखी होते अशा वेळेस ताजे ताक प्यावे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ