जननी सुरक्षा योजना (janani suraksha yojana) ही 100 टक्के केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. कस्तुरबा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जननी सुरक्षा योजनेची सुरुवात 12 एप्रिल 2005 साली करण्यात आली. जाणून घेऊया जननी सुरक्षा योजनेची सुरुवात कधी झाली. सध्याच्या घडीला जननी सुरक्षा योजना ही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राबविली जात आहे.
जननी सुरक्षा योजनेबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Janani suraksha yojana in marathi
जननी सुरक्षा योजना कोणासाठी आहे?
जननी सुरक्षा योजना (jsy scheme) ही समाजातील दारिद्र्यरेषेखालील असलेले घटक यामध्ये प्रामुख्याने (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती) या कुटुंबातील 19 वर्षांवरील गर्भवती असलेल्या महिलांसाठी आहे. जननी सुरक्षा योजनेचा लाभ लाभार्थीस स्वतःची दोन अपत्य जिवंत असेपर्यंत घेता येते.
जननी सुरक्षा योजना चालू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे?
- गर्भवती महिलांच्या संस्थात्मक प्रस्तुतींना प्रोत्साहन देऊन अर्भकमृत्यू दर कमी करणे आहे.
- जननी सुरक्षा योजनेत ASHA कार्यकर्ती सरकार व गर्भवती महिला या दोघांमधील मुख्य दुवा म्हणून सदैव कार्यरत असते.
- जननी सुरक्षा योजनेचा चालू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रस्तुतीच्या दरम्यान आई व बाळाचा मृत्यू दर कमी करणे.
जननी सुरक्षा योजनेचा फायदा कसा घेऊ शकाल?
जननी सुरक्षा योजना अंतर्गत महिलांनी गर्भावस्थेत दरम्यान गावच्या अंगणवाडीमध्ये आपले नाव नोंदवावे तसेच नवजात बाळाच्या परिस्थितीच्या वेळेस सरकारी दवाखान्यात नाव नोंदवले असल्यास तुम्ही जननी सुरक्षा योजनेचा फायदा घेऊ शकाल.
जननी सुरक्षा योजना अंतर्गत गर्भवती महिलांना किती अनुदान मिळेल?
ग्रामीण भागातील महिलांना 1400 रुपये अनुदान मिळेल शहरी भागातील महिलांना 1000 रुपये पर्यंत मदत मिळेल. (प्रस्तुती नंतर 7 दिवसाचा आत) तसेच गर्भवती महिलांना प्रस्तुतीनंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 5000 रुपये देखील अनुदान मिळेल.
हे सुद्धा वाचा:– जाणून घेऊयात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विषयी थोडक्यात माहिती
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव कुठे नोंदवावे?
जननी सुरक्षा योजनेचा (janani suraksha yojana scheme) लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांनी जवळच्या अंगणवाडी शाळेत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर (सरकारी) आपले नाव नोंदवावे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी गर्भवती महिलेजवळ एमसीएच कार्ड सोबतच जननी सुरक्षा योजनेचे कार्ड असणे देखील आवश्यक आहे.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.