गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि तोटे | Jaggery Tea Benefits in Marathi

हिवाळ्यामध्ये अनेक लोकांना गूळ खायला आवडते.हा पदार्थ गरम असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचं सेवन करण्याला अनेकांची पसंती असते. काहीजण नुसताच गूळ खाण्याऐवजी गुळाचा चहा पिण्याला पसंती देतात. आरोग्यासाठी हा चहा अतिशय लाभदायी असतो.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या चहाचे खूप फायदे शरीराला या दिवसांमध्ये होतात. यामुळं पाचनशक्तीही सुरळीत राहते.

गुळाचा चहाचे फायदे काय आहेत ? | Jaggery Tea Benefits in Marathi

  • साखरेच्या तुलनेत गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन असतात. त्यामुळे शरीराला फायदाच होतो.
  • मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठीही हा चहा खूप फायदेशीर ठरतो.
  • गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शरीरात रक्त कमी असल्यासही हा चहा प्यायल्यास हे प्रमाण नियंत्रणात येतं.
  • गुळाचा चहा पिल्याने मायग्रेनमध्येही आराम मिळतो.

गुळाचा चहाचे तोटे काय आहेत ?

वजन वाढणं– 100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 385 कॅलरी असतात. त्यामुळं डाएट करणाऱ्यांनी याचं सेवन कमी प्रमाणात करावं. पण, वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे सेवन फायद्याचं ठरतं.

मधुमेह – गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचं सेवन शक्यतो टाळलेलं बरं.

नाकातून रक्तस्त्राव – गूळ मुळातच एक गरम पदार्थ आहे. त्यामुळं गरम वातावरणात याचं सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त येत.पोटातील गरमी वाढल्यामुळं याचे परिणाम त्वचेवरही दिसून येतात.

पॅरासिटीक इन्फेक्शन – अती गुळ खाणं ज्याप्रमाणं घातक ठरु शकतं त्याचचप्रमाणं खराब दर्जाचा आणि योग्य पद्धतीनं तयार न केला गेलेला गुळ खाणंही धोक्याचं असतं. म्हणून मार्केटमधून गुळ घेताना ते पडताळून पाहणं खूप गरजेचं असतं

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ