गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Jaggery health benefits

Jagger health benefits पूर्वीच्या काळात साखरेच्या ऐवजी गुळाचा जास्त वापर केला जायचा. गूळ आणि साखर हे दोन्ही उसापासून तयार होते पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचे महत्व आणि वापरही कमी होऊ लागला आहे. 

पूर्वी गुळाच्या पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू यासारख्या पारंपारिक पदार्थ मध्ये गुळाचा जास्त वापर व्हायचा. आताही करतात पण थोड्या प्रमाणात. हे फक्त सनापुरता आणि इतर दिवस गुळाचा वापर जास्त होत नाही.

गुळाचा जास्त वापर हा स्वयंपाकात विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण गूळ उष्ण असल्यामुळे त्यामध्ये शरीराला पुरेशी उष्णता मिळते. गुळामध्ये  विटामिन्स, लोह, ग्लुकोज, फॉस्फरस, पोटॅशियम याचे प्रमाण असते. ह्यामुळेच गुळ हे शरीरासाठी खूप चांगले असते.

 गुळाचा आहारात सामावेश असलाच पाहिजे.  गळ हे फक्त गोडवा वाढविण्यासाठीच नाहीतर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

आरोग्यदायी फायदे- Benefits of jaggery

शरीराला पुरेशी उष्णता मिळते- health benfits of jaggery in marathi 

थंडीच्या काळात शरीराला उष्णतेची गरज असते.या वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामूळे सर्दी खोकला,ताप असे आजार होतात. मात्र गुळातील एंटीऑक्सीडेंट मुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी थंडीत गुळ खाणे कधी फायद्याचे

अशक्तपणा नाहीसा होतो- Reduces weakness

गुळामध्ये लोहा आणि फॉलेट असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. जर तुमच्या शरीरात अशक्तपणा अथवा आणि  अशक्तपणामुळे लाल रक्त पेशी कमी झाल्या असतील तर गूळ खाण्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नियमितपणे गूळ खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत मिळते.

पचनक्रिया सुधारत- Helpful in digestion

 गूळ हा एक पाचक पदार्थ आहे. यामुळे जेवणानंतर अनेक ठिकाणी गूळ खाण्याची पद्धत आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

इन्स्टंट ऊर्जा मिळते  – Instant energy 

पहिले एखादी व्यक्ती बाहेरून घरी आल्यावर किंवा पाहुणे आल्यावर गुळ आणि पाणी देण्याची पद्धत होती. कारण थकून भागून घरी आलेल्या व्यक्तीला गुळ आणि पाणी दिल्यामुळे त्याचा थकवा दूर होऊन जायचा. यासाठी थकवा अथवा अशक्तपणा जाणवत असेल तर गुळाचा एक छोटासा खडा आणि पाणी प्यावे त्यामुळे तुम्हाला इन्स्टंट शक्ती मिळू शकते.

वजन कमी होण्यास मदत होते- Jaggery benefits for weight loss

गोड पदार्थामुळे वजन वाढते हे तर तुम्हाला माहीतच असेल, पण गुळाच्या बाबतीत अगदी उलट आहे गुळाचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.

सांधेदुखी कमी होतो- jaggery benfits for skin

 जर तुम्हाला सतत सांधेदुखीचा त्रास होत असेल तर दूध आणि गूळ खाल्ल्यास हा त्रास नाहीसा होईल. ह्या मिश्रणामध्ये थोडसं आद्रक मिसळून पिल्यास उत्तम राहील. कारण हे तिन्ही पदार्थ तुमचे हाडे मजबूत करण्याचे काम करत.

महिलांना मासिक पाळीत आराम मिळतो-jaggery powder benefits

 मासिक पाळी आणि त्या काळात होणाऱ्या वेदना याचा अनुभव प्रत्येक स्त्रियांना असतो. मासिक पाळीत  होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन नियमित केल्याने चांगला फायदा होऊ शकतो.

रक्त शुद्धीकरण

 गूळ शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते. शिवाय हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. 

टीप:– जास्त प्रमाणात गूळ खाण्यामुळे मात्र रक्त दूषित होऊन अंगावर फोडे येण्याचा धोका असतो, म्हणून ज्यांना त्वचेचा रोग असतील त्यांनी गुळ खाऊ नये.

 Note – जर तुम्हाला Jaggery of benefits  ही माहिती फायदेशीर वाटत असल्यास शेअर जरूर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button