वरून काटेरी, खडबडीत तरी आतून मात्र रसाळ, गोड असे फणसाचे वैशिष्ट्य आहे. फणसाच्या आत घट्ट तसेच लिबलिबीत गरे असतात. घट्ट गरे असलेल्या फणसाला ‘कापा’ तर लिबलिबीत व बरबरीत गरे असलेल्या फणसाला ‘बरका’ फणस म्हणून ओळखले जाते.
अत्यंत गोड अशा गऱ्यांचा खाण्यासाठी उपयोगी होतो. या गऱ्यांच्या आत आठळ्या असतात. या आठळ्यांची भाजी करून खाल्ली जाते किंवा त्या उकडूनही खाल्ल्या जातात. कच्च्या फणसाचीही भाजीसुद्धा विशेष चवीने खाल्ली जाते.
फणस खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे? | jackfruit benefits in marathi
- पिकलेला फणस (Jackfruit) स्निग्ध, पुष्टीकारक, मांस, कफ व वीर्यवर्धक असतो तसेच तो शीतल असून पित्त व वायुहारकही आहे. पिकलेला फणस रक्तपित्त विकाराचा नाश करतो.
- फणस वायुदोष दूर करून शक्ती व आरोग्य वाढवतो.
- कच्चा फणस पचण्यास जड, वायुकारक, कफ व मेदवर्धक असतो तर आठळ्या वीर्यवर्धक, पचण्यास जड, मूत्रवर्धक व जुलाबांमध्ये फायदेशीर ठरतात.
हे सुध्दा वाचा:- डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- अग्निमांदय तसेच पोटात गोळा उठणाऱ्या माणसांनी फणसाचे सेवन जरा जपूनच करावे कारण फणस पचण्यास जड असतो.
- फणसाचे अतिरेकी सेवन केले असता अपचनाला सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यावर खोबरे खाल्ले असता बराच फायदा होतो.
Note- फणसाचे गरे खाल्ल्यावर त्यावर पान खाऊ नये तसेच पाणीही पिऊ नये असे केल्याने पोट फुगते व त्रास होतो.
Note – 2 – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.