युरोपमधील या कार शोमध्ये ‘इलेक्ट्रिकल’ वाहनांचे वर्चस्व

कोरोना महामारीनंतर युरोपने आपला सर्वात मोठा ऑटो शो येत्या सोमवारपासून म्यूनिचमध्ये सुरू झाला. गेल्या दोन वर्षांतील हा युरोप मधील सर्वात मोठा शो आहे. व तो 12 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या शोमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे बहुतांश कंपन्या आपल्या नव्या गाड्या लॉन्च करणार आहे.

तसेच या शोचे मुख्य आकर्षण म्हणजे बहुतांश कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार सादर करणार आहेत. त्यामधील काही आघाडीच्या कंपन्याही आपले नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहेत. त्यामधील ऑडीची इलेक्ट्रिकल कार जी 100 किमीचा वेग 4 सेकंदात पकडू शकते.तसेच रेनोची ‘मॅगन’ ही इलेक्ट्रिकल काळजी फेब्रुवारी 22 मध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, बोर्डवरील बहुतांश भाग हा टच स्क्रीन स्वरूपात असणार आहे.

हे वाचा- स्मार्टफोनने बाईक होणार लॉक आणि अनलॉक? काय आहे ही भानगड थोडक्यात जाणून घेऊया.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी मर्सिडीज मॅबेकने ईक्यूएस ही कन्सेप्ट एसयूव्ही सादर केली ती साधारणपणे फेब्रुवारी 22 मध्ये बाजारात येईल.ॲटलस व्हर्टीकल टेकऑफ लँडिंगची एअर क्राफ्ट आणली आहे. युरोपमधील या कार शोमध्ये इलेक्ट्रिकल वाहनांचे वर्चस्व दिसून आले. तसेच बहुतेक कंपन्यांनी इलेक्ट्रिकल कार सादर केल्या आहेत यामध्ये मर्सिडीज, फोक्सवॅगन, डेमलर, BMW, ऑडी, फोर्ड सारख्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

युरोपमधील या कार शो मध्ये 68 कार कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. आणि याचं बरोबर 60 दुचाकी कंपन्यांनी सुद्धा शोमध्ये सहभाग नोंदवला आहे.युरोपमधील हा शो आधी ‘Frankfurt auto show’ ह्या नावाने ओळखला जायचा तसेच 1951 पासून फ्रँकफर्टमध्ये यांचे आयोजन केले जात आहे.एकदरीत ‘म्युनिच’ आंतरराष्ट्रीय शोममध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा धबधबा दिसून आला.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button