मसाले व गरम मसाले संबंधी महत्वाच्या टिप्स | Important Tips for Using Herbs and Spices

नमस्कार मित्रांनो, आज आपण मसाले व गरम मसाले संबंधी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. आपल्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर राहणार आहेत. मसाले व गरम मसाले संबंधी कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ह्यासाठी ही पोस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊया.

मसाले व गरम मसाले संबंधी महत्वाच्या टिप्स | Important Tips for Using Herbs and Spices

 1. मसाले केल्यानंतर कोरड्या व घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरून ठेवावेत म्हणजे मसाल्याचा वासही उडून जाणार नाही व रंगही कायम राहील.
 2. पावडरी करण्यापूर्वी मसाले चांगले वाळवून किंवा गरम करून केल्यास पावडरी बारीक दळल्या जातील. नाहीतर पावडरी चरचरीत राहतील.
 3. शेंगदाणा कूट किंवा खोबऱ्याचे कूट करताना मिक्सरमध्ये जास्त फिरवू नये. किंवा गरम असताना फिरवू नये. नाहीतर कुटाला तेल सुटून कूट चिकट होईल.
 4. कूट केल्यानंतर घट्ट झाकणाच्या बरणीत किंवा डब्यात ठेवल्यास चांगले राहते. तसेच पाण्याचा हात लावू नये म्हणजे खराब होणार नाही.
 5. ताक जर आंबट असेल तर त्यात भरपूर पाणी ओतून ठेवावे. ताक तळाला बसून वर पाणी राहील ते ओतून टाकले म्हणजे ताकाचा आंबटपणा जाईल.
 6. लोणी जर खूप दिवसांचे असेल व त्याला वास येत असेल तर पाण्यात खायचा सोडा घालून त्यात लोणी घालून धुवावे व नंतर चांगल्या पाण्याने धुवावे म्हणजे लोण्याचा वास निघून जाईल.
 7. लोण्याला जर वास येत असेल तर तूप कढवताना त्यात 1-2 विड्याची पाने टाकावीत म्हणजे लोण्याचा वास जातो.
 8. तूप कढवताना चिमूटभर मीठ टाकले म्हणजे तुपाला कणी येते.
 9. तूप जर कच्चे कढले तर तुपाला लवकर वास येऊ लागतो.
 10. सॉस बेताचे जाड व पूर्ण थंड झाल्यावर बाटलीत भरावे.
 11. सॉस टिकण्यासाठी त्यात सोडियम बेंझाइट किंवा पोटॅशियम मेटा बाय सल्फाइट घालावे. मेटाबाय सल्फाइटला उग्र वास जास्त येतो. सोडियम बेंझाइटला वास कमी असतो व चवही वेगळी लागत नाही.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button