‘पालेभाज्या’ खरेदीसंबंधी महत्त्वाच्या टिप्स | Important Tips for Buying leafy vegetables

नमस्कार मित्रांनो, आज आपण पालेभाज्या खरेदी संबंधी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. आपल्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर राहणार आहेत. पालेभाज्या खरेदी करताना कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ह्यासाठी ही पोस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या भाज्या बद्दल.

पालेभाज्या खरेदीसंबंधी महत्त्वाच्या टिप्स | Important Tips for Buying leafy vegetables

कोथिंबीर

कोथिंबीर घेताना हिरव्यागार व भरपूर पानांची व कोवळ्या देठांची बघून घ्यावी. लांब देठांची व मोजक्याच पानांची कोथिंबीर घेऊ नये. त्या कोथिंबिरीला वासही नसतो व देठ जाऊन कोथिंबीर कमी निघते. पावसाळ्यात कोथिंबीर घेताना मुळाकडे बघून घ्यावी. देठ मऊ असल्यास कोथिंबीर सडते.

टीप- कोथिंबिरीचे देठ काढून साफ करून, ओलसर असल्यास पेपरावर पसरून कोरडी झाल्यावर डब्यात भरून ठेवावी. डब्यात भरण्याआधी तळाला पेपर घालावा.

पुदिना

पाने हिरवीगार असलेला पुदिना घ्यावा. पाने वाळलेली व काळवंडलेली असल्यास वास कमी असतो.

कढीलिंब

बारीक व काळसर हिरव्या रंगाचा कढीलिंब घ्यावा. त्याला वास छान असतो.

चवळी व लाल माठ

चवळी व लाल माठ घेताना मुळासकट, कोवळा व टवटवीत पानांचा बघून घ्यावा. खूप जाड देठ असलेला घेऊ नये. वरती फुलावर धरलेलीही घेऊ नये. कोवळ्या चवळीची पाने हिरवीगार असतात व लाल माठाची पाने काळपट लाल असतात. कोणत्याही पालेभाजीची जुडी घेताना अर्धी पाने बाजूला करून मध्यमभाग पाहावा. खूप वेळा मध्ये शिळी भाजी व गवत भरलेले असते.

पालक

पालक घेताना हिरव्यागार पानांचा, टवटवीत व कोवळ्या घ्यावा. देठाक जुडी ओलसर मऊ असेल तर आतमध्ये कुजकी व मऊ पाने असतात.

मेथी

मेथी दोन प्रकारची असते. जाड घाटी मेथी व बारीक बोटांएवढी लांब असलेली मेथी.

  1. मोठी जाडी मेथी हिरव्यागार पानांची व कोवळ्या देठांची बघून घ्यावी. चरचरीत व कडा वळलेल्या पानांची मेथी घेऊ नये. ती जून असते व भाजी मिळून येत नाही.
  2. बारीक व रेतीत लावलेली मेथी हिरव्यागार पानांची व घट्ट देठांची बघून घ्यावी. ही मेथी देठाकडे मऊ असेल तर लगेचच सडते व खराब होते.

टिप- ही मेथी आणल्यावर लगेचच मुळे काढून साफ करून चाळणीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवावी. साफ न करता ठेवल्यास लगेचच खराब होते.

मुळा

मुळा घेताना भरपूर हिरवीगार पाने असलेला व पांढराशुभ्र असलेला मुळा बघून घ्यावा.मुळ्याचा तुकडा मोडून पाहिल्यास आतून कापसासारखा व पांढरे ठिपके असलेला घेऊ नये. तो कडक असतो व फुकट जातो.

अळू

अळू दोन प्रकारचे असते. भाजीचे अळू व वडीचे अळू.

  1. भाजीचे अळू हिरव्यागार व छोट्या पानांचे कोवळे तसेच काळ्या देठांचे बघून घ्यावे. कोवळ्या व छोट्या पानांचे अळू चांगले शिजून मिळून येते. काळ्या देठांच्या अळूला खाज कमी असते.
  2. वडीचे अळू हिरव्यागार टवटवीत पानांचे व स्वच्छ व न फाटलेल्या पानांचे बघून घ्यावे.

वडीच्या अळूची पाने जाड असतात व देठ काळे असतात.

फोडशी

हिरव्यागार कोवळ्या पातीची फोडशी घ्यावी.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button