दर महिन्याला प्रत्येक महिलेला मासिकपाळीच्या चक्रातून जावे लागते. मुळात मासिकपाळी ही स्त्रीसाठी वरदान आहे. परंतु या दरम्यान काही महिलांना विविध त्रास होतात ते त्रास मात्र खूप त्रासदायक आहेत.
मासिकपाळी दरम्यान स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल घडतात व त्यामुळे शरीरावर त्याचे परिणाम दिसतात. तसे बघितले तर 150 प्रकारचे दोष आढळतात. उदा. ओटी पोटात दुखणे हा त्रास खूप महिलांना होतो. याशिवाय मानसिक तणाव जाणवणे, थकणे, छातीत दुखणे, कडकपणा येणे, चिडचिड होणे, दुःखी, उदास वाटणे, वजन वाढणे, पचनक्रिया बिघडणे, खूप भूक लागणे, गॅसेस होणे, मलावरोध होणे, शरीरात पाणी साठणे असे अनेक प्रकारचे दोष आढळतात. हे सर्वच दोष प्रत्येक स्त्रीमध्ये असतीलच असे नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात.या दोषांचे निवारण करण्यासाठी योग्य तो आहार आवश्यक आहे. आहाराची थोडीशी काळजी घेतली तर या त्रासावर मात करता येते.
योग्य आहार
- आहारात तृणधान्ये व तंतुमय पदार्थांचा समावेश करावा. तृणधान्यातील कर्बोदके आणि तंतुमय पदार्थांच्या साहाय्याने शरीरास योग्य ऊर्जा मिळते व शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. याचबरोबर तंतुमय पदार्थ आणि तृणधान्यांमुळे मेंदूतील सेरिटोनिन Seritonin नावाचे केमिकल वाढण्यास मदत होते. जे आपल्याला शांत राहण्यास आणि मूड चांगला राखण्यास मदत करते तसेच गोड खाण्याची इच्छा अथवा अतिरिक्त भूक लागणे कमी करते.
- कॉफी, चॉकलेट, कोको पावडर, कोको कोला अर्थात ज्या पदार्थात कॅफीन आढळते असे पदार्थ खाणे टाळावे.छातीमध्ये दुखणे, कडक होणे व गाठी निर्माण करण्यासकॅफीनयुक्त पदार्थ कारणीभूत असतात.
- अतिरिक्त मीठ आणि तेलकट पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. मीठामुळे शरीरात पाणी साठते. असे पाणी साठणे प्रकृतीसाठी योग्य नसते. शरीरास पाण्याची कमतरता जाणवली तर शरीर पाणी साठवते. यालाच मेडिकल भाषेत Water Retertion म्हणतात. अशाप्रकारे शरीरास पाण्याची कमतरता भासू नये म्हणून भरपूर पाणी प्यावे. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ जसे केळी, पालेभाज्या हेही शरीरात पाणी साठण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात. त्यांचा आहारात समावेश करावा.
हे सुध्दा वाचा- मधुमेह म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे
- मासिकपाळीत सर्वात कॉमन समस्या असते ती ओटीपोट दुखण्याची. या दुखण्याचे मुख्य कारण आहे प्रोस्टाग्लॅडिन हार्मोन्स. आपल्या शरीरातील काही हार्मोन्स चांगले असतात तर काही अनावश्यक असतात. हे अनावश्यक हार्मोन्स वाढल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखते. मांसाहार तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थात सॅच्युरेटेड फॅटस् आढळतात. या फॅटसमुळे हानिकारक प्रोस्टाग्लॅडिन हार्मोन्स वाढतात. म्हणून असे पदार्थ आहारात घेणे टाळावे. शरीरास जे फॅटस् आवश्यक आहेत ते सुकामेवा, तेलबिया यांच्यात असतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करावा.
- व्हिटॅमिन ‘ई’ (E) प्रोस्टाग्लॅडिन बनण्यास मज्जाव करते. म्हणून व्हिटॅमिन ‘ई’ युक्त पदार्थ जसे सुकामेवा, बदाम, अक्रोड, खरबूज बिया, खसखस यांचा आहारात समावेश करावा. मास्यांमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ बरोबर सेलेनियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3 आढळते त्यामुळे आहारात मासे असणे फायदेशीर ठरते.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.