चिकन, मटण, मासे खरेदीसंबंधी महत्त्वाच्या टिप्स | Important Points to Remember While Buying Meat in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण चिकन, मटण, मासे खरेदी संबंधी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. आपल्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर राहणार आहेत. चिकन, मटण, मासेखरेदी करताना कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ह्यासाठी ही पोस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊया.

चिकन, मटण, मासे खरेदीसंबंधी महत्त्वाच्या टिप्स | Important Points to Remember While Buying Meat in marathi

चिकन

देशी चिकनला रंगीबेरंगी पिसे असतात. इंग्लिश व ब्रॉयलर चिकनला सफेद पिसे असतात. इंग्लिश व देशी चिकनला शिजायला वेळ जास्त लागतो पण चवीला चांगल्या असतात व जास्त शिजल्या तरी शिजून कुस्करत नाहीत. इंग्लिश व देशी चिकन सव्वा किलोपेक्षा मोठ्या घेऊ नयेत. जास्त मोठ्या घेतल्यास जून असतात व शिजायला वेळ लागतो व चिरताना मांसाचे दोर दोर निघतात. ब्रॉयलर चिकन घेताना शक्यतो पिसासह 13 किलोपेक्षा मोठ्या घेऊ नयेत. 2 किलो वजनाची चिकन असल्यास चिरताना मांसाचे दोर दोर निघतात व चवीलाही कमी असतात.

मटण

मटण घेताना फिकट गुलाबी रंगाचे बघून घ्यावे. ते मटण कोवळे असते व पटकन शिजते.लालसर तांबूस रंगाचे मटण जून असते; ते शिजायला वेळ लागतो व त्याला एक प्रकारचा उग्र वास येतो.

मासे

कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास जर तिथे खड्डा पडला तर मासे शिळे व खराब आहेत असे समजावे.

पापलेट

रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेटं ताजी असतात. पापलेटं घेताना त्यांच्या डोळ्यांखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास पापलेटं ताजी असतात. लाल पाणी आल्यास पापलेटं शिळी असतात. तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.

भिंगी, सुरमई, रावस, करली, हलवा

सुरमई, रावस, करली व हलवा घेताना घट्ट बघून घ्यावे. माशाचे तोंड उघडून पाहिल्यास, लालसर भाग दिसल्यास मासे ताजे असतात व काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब असतात.

कोलंबी

कोलंबी लाल व पांढरी अशी दोन प्रकारची येते. पांढरी कोलंबी पचायला हलकी व चवीला जास्त चांगली असते.
लाल कोलंबी- काळसर लाल व पांढऱ्या हिरवट रंगाची लाल कोलंबी ताजी असते. ही कोलंबी रंगाने ऑरेंज कलरची होऊ लागली की शिळी व खराब झाली असे समजावे. तसेच शिळ्या व खराब कोलंबीची डोकी तुटलेली असतात. ताजी कोलंबी घट्ट व कडक सालीची असते. शिळ्या व खराब कोलंबीचे साल मऊ पडलेले असते व घाण वास येतो. पांढरी कोलंबी- पांढरी कोलंबी पांढऱ्या स्वच्छ रंगाची, घट्ट व चमकदार दिसणारी ताजी असते.पांढऱ्या कोलंबीला जर पिवळसर काळा रंग येऊ लागला तर ती शिळी व खराब होत आली असे समजावे. तसेच कोलंबीची डोकी तुटू लागलेली व डोक्याला काळा रंग येऊ लागलेली व साल मऊ पडलेली कोलंबी शिळी व खराब झालेली असते. ती घेऊ नये.

करंदी

तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते.

बांगडे

काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात. बांगडे शिळे व खराब झाल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो व मऊ पडतात. दाबल्यास खड्डा पडतो.

बोंबील

ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार दिसतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. बोंबील शिळे व खराब होत आले की त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.

मुडदुशा (रेणव्या)

पांढऱ्यास्वच्छ, घट्ट व चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा ताज्या असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या की त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात.

मांदेली

पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व तोंडाच्या आतील भाग लाल असलेली मांदेली ताजी असतात. मांदेली शिळी व खराब होऊ लागली की तिला ऑरेंज रंग येऊ लागतो व मऊ पडतात.

बोय

काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय ताजी असते. जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमुस वास असतो.

शेवंड, खाडीची मोठी कोलंबी

शेवंड व खाडीची कोलंबी घेताना घट्ट व कडक सालीची व ताजी बघून घ्यावी.

ओला जवळा

ओला जवळा घेताना पांढऱ्यास्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा.

शिंपल्या (तिसऱ्या)

शिंपल्या घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात. किंवा जिवंत असणाऱ्या तोंडे उघडझाप करणाऱ्या घ्याव्यात. शिंपल्या खराब व शिळ्या झाल्या की त्यांची तोंडे उघडी पडलेली असतात. मिटत नाहीत. पिवळ्या रंगाचे शिंपल्यासारखे दिसणारे खुबे घेऊ नयेत. त्याच्या आतील मास्टे पांढरी व चिवट असतात. शिजत नाहीत.

कालवे

कालवे घेताना पांढऱ्या रंगाची, मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत. छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात.

चिंबोरी (खेकडे)

चिंबोऱ्या घेताना काळसर रंगाच्या, जिवंत व चालणाऱ्या बघून घ्याव्यात. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पाहावी. खेकड्याची पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. व दाबल्यानंतर पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खायला काही मिळत नाही. तसेच अमावास्येला खेकडे मांसाने भरलेले असतात व पौर्णिमेला आतून पोकळ असतात असे म्हणतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button