आजच्या आधुनिक युगात विक्री खरेदीच्या व्यवहारात सहसा फसवेगिरी होत नाही. पण फसवेगिरी झाल्यास ग्राहक म्हणून आपल्याला काही अधिकार आहेत. याबद्दल बहुतांश लोकांना माहीत नसते. परिणामी लोक तक्रार करायला व त्यापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी तक्रार करण्याचे टाळतात, त्यासाठी आज आपण ग्राहकाच्या अधिकाराबद्दल जाणून घेणार आहोत.
ग्राहकाचे अधिकार कोणकोणते आहेत? | Importance of consumer rights in marathi
- ग्राहकाने वस्तू ऑनलाईन खरेदी केलेले असेल तर अशा शॉपिंग साइट्स त्या वस्तूची जबाबदारी टाळू शकत नाहीत. त्यामुळे त्याविरुद्ध तक्रार नोंदवून दाद मागता येते.
- खरेदी केलेल्या वस्तूमध्ये काही दोष आढळल्यास भाड्याने घेतलेल्या सेवांमध्ये काही कमतरता असल्यास तसेच विक्रेत्याने जास्त शुल्क आकारले असल्यास त्याबद्दल तक्रार करता येत.
- ग्राहकाच्या हिताचा विचार करण्यासाठी निर्माण केलेल्या विविध मंचांमध्ये प्रतिनिधित्वाचा अधिकार ग्राहकांना आहे.
- जीवन आणि संपत्तीसाठी नुकसानदायक सामान आणि सेवेच्या विक्री विरोधात सुरक्षिततेच्या अधिकाराचा वापर करून ग्राहक अधिकार (दाद) मागू शकतात.
- अनुचित व्यापार पद्धती किंवा ग्राहकांच्या शोषणाविरुद्ध तोडगा काढण्याचा अधिकार असतो.
- खाजगी,शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवेतील निष्काळाजीपणामुळे रुग्णांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागल्यास त्याची तक्रार मंचत करता येते.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.