EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना युजर्सच्या सोयीसाठी अनेक सेवा पुरवते. विशेष म्हणजे पीएफ खात्यातील पैसे ऑनलाईन कसे काढता येतील. तसेच तुम्हाला घरबसल्या काही मिनिटात पीएफमधील पैसे दुसऱ्या खातात ट्रान्सफर ( Transfer) करू शकता याबद्दलची माहिती आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
ईपीएफ (EPF) मध्ये दर महिन्याला तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ मधून जमा केला जातो. त्या रकमेवर ठराविक व्याजही मिळते. जर तुम्ही नोकरी सोडली तरी पीएफ खाते तसेच राहते. जर तुम्हाला पीएफ पैसे ऑनलाइन कुठेही ट्रान्सफर करण्यासाठी सर्वप्रथम खातेदारकाला त्याचा UAN Active करावा लागेल याशिवाय खातेधारकाचा बँक खाते क्रमांक आधार क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर सर्व तपशील अचूक आणि योग्यरीत्या सामावेश करणे आवश्यक आहे.
ईपीएफ (EPF) ऑनलाईन कसे ट्रान्सफर करावे? | How to transfer pf account know step by step process
- आधी https //unifiedportal-mem.emp.epfindia.gov.in/memberinterface वर जा
- येथे तुम्हाला तुमचा UAN क्रमांक टाकून पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर लॉगिन होईल.
- ऑनलाइन सेवेसाठी वन मेंबर वन ईपीएफ वर तुम्ही ज्या कंपनीत कामाला आहात त्या कंपनीशी संबंधित माहिती देणारे खाते तुम्हाला व्हेरिफाय करावे लागेल.
- नंतर Get Details पर्यायावर तुम्हाला आधीच्या कंपनीचे पीएफ संबंधी सर्व माहिती मिळेल.
हे सुध्दा वाचा:- सेविंग आणि सॅलरी खाते या दोन्ही अकाउंट मधील फरक तुम्हाला माहित आहे का?
- येथे तुम्हाला पूर्वीची कंपनी आणि सध्याची कंपनी यातील निवड करावी लागेल दोन्हीपैकी कोणतीही कंपनी निवडा आणि सदस्य आयडी किंवा UAN आयडी टाका.
- आता गेट ओटीपी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो ओटीपी इंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्ही सोपी प्रोसेसचा उपयोग केल्यास. तुमच्या ईपीएफ खात्याशी ऑनलाईन ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होईल.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.