उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ उपाय | How To Take Care Of Your Skin In Summer

उन्हाळा सुरू झाला आहे. आता अंगाची काहिली होईल, घामाच्या धारा लागतील, उकाड्याने जीव हैराण होईल. या सगळ्यापासून सुटका मिळावी म्हणून कुठेही बाहेर फिरण्याची गरज नाही. कारण, आपण घरच्या घरी आपल्या त्वचेची उत्तम काळजी घेऊ शकतो आणि उन्हाळ्याने उद्भवणाऱ्या आजारांचा घरच्याघरी दी एंड करू शकतो. हे घरगुती उपाय कोणते आहेत? जाणून घेऊयात,

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ उपाय | How To Take Care Of Your Skin In Summer

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा पुरळ दूर करण्यासाठी हे नक्कीच चांगला उपाय आहे. एका वाटीत खाण्याच्या सोड्याची पावडर आणि तितकेच चमचे पाणी घ्या. घोटून हे मिश्रण तयार करा. ओलावा आणि घाम शोषण्यासाठी बेकिंग सोडा पुरळांवर लावा. हे खाज कमी करेल आणि पुरळ बरे होत असताना तुम्हाला अधिक आरामदायक वाटेल. हा एक जुना म्हणजे आजीच्या बटव्यातला उपाय आहे, दर काही तासांनी पुन्हा लावा, त्वचा अगोदर स्वच्छ धुवा आणि कोरडी करा.

कच्चा बटाटा

कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण 20 मिनिटे तसेच लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करा.

कोरफड

प्रथम, साबण आणि पाण्याने फोड स्वच्छ धुवा. फोडावर कोरफडीचे जेल लावा आणि ते बरे होण्यासाठी मलमपट्टीने झाकून टाका. परंतु आपण वनस्पतीचे शुद्ध जेल वापरत आहोत याची खात्री करा. काही प्रक्रिया केलेल्या उत्पादनांमध्ये अल्कोहोलसारखे घटक असतातज्यामुळे चांगला परिणाम होत नाही.
व्हिनेगर सनबर्न शांत करण्यासाठी व्हिनेगर वापरा. व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असते. हे सनबर्नच्या वेदना, खाज सुटणे आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकते. कागदाचे काही तुकडे पांढऱ्या व्हिनेगरमध्ये भिजवा आणि जळलेल्या ठिकाणी लावा. व्हिनेगर पूर्ण शोषून घेईपर्यंत ते कागद राहू द्या. आवश्यकतेनुसार पुन्हा करा.

मुलतानी माती

मुलतानी माती बंद झालेले छिद्र साफ करण्यासाठी, उष्णतेवर उपचार करण्यासाठी आणि त्वचा लवचिक आणि ताजी तवानी बनवण्यासाठी उत्कृष्ट घरगुती उपाय आहे. त्वचेसाठी प्राचीन काळापासून याचा वापर केला जात आहे. कारण ते जास्तीचे सेबम काढून टाकते, त्वचा तडकण्याचा धोका कमी करते, त्वचेची घाण साफ करते आणि उष्ण त्वचेला थंडावा देते. गुलाबपाणी किंवा दूध घालून मुलतानी मातीची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. हे १०-१५ मिनिटे राहू द्या आणि थंड पाण्याने चांगले धुवा. दररोज ही पेस्ट लावा. उत्तम परिणाम तुम्हाला दिसून येतील.

कडुलिंबाची पाने

कडुलिंबाची पाने रामबाण उपाय ठरू शकतात. तुमचा त्वचा कोणत्याही प्रकारची असू दे. या पानांमुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि त्वचेवरील मृत पेशींना मऊ करते आणि त्यांना काढून टाकते. त्वचा नितळ आणि उजळ बनवते. उन्हाळ्यातील जळजळ झालेल्या त्वचेला शांत करण्यासाठी हा एक उत्तम घटक आहे. कारण त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे तुमच्या त्वचेचे मेलेनिन उत्पादन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. इतकेच काय, ते तुमच्या त्वचेवरील काळे डाग, लालसरपणा देखील कमी करते. आपल्या घरी उन्हाळ्यात कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून ते अंघोळीसाठी वापरलं जायचं तेच यामुळेच. कडुलिंबाचा फेस मास्क बनवण्यासाठी दोन चमचे कडुलिंबाची पावडर थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा . चिमूटभर हळद पावडर घालून 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून स्वच्छ धुवा.

बेसन पीठ

बेसन हे आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध असते. त्वचेच्या मृत पेशींना खोलवर साफ करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी वापरलं जाते. स्वयंपाकघरात हा सहज मिळणारा पदार्थ खाज सुटणे आणि त्वचेची जळजळ यांपासून त्वरित आराम देतो. तसेच, त्वचेवर येणारा काळपटपणा ज्याला टॅनिंग म्हणतात ते काढून टाकण्यास आणि त्वचा उजळ करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे त्वचेचा रंग एकसारखा व्हायला मदत होते.

ग्रीन टी

हल्ली बहुतेक घरांमध्ये वजन कमी करण्यासाठी – ग्रीन घेतला जातो. ग्रीन टी सुद्धा त्वचेसाठी गुणकारी आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि दाह-विरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करतात. तुमच्या त्वचेवर ग्रीन टी लावल्याने किरकोळ कापलेल्या जखमा आणि सनबर्नलाही आराम मिळतो. खरं तर, ग्रीन टी उन्हात गेल्यामुळे उठणारे छोटे चट्टे, सुरकुत्या यांसारख्या गोष्टी कमी करण्यास देखील मदत करू शकतो. तर असे हे घरगुती या उन्हाळ्यात नक्की वापरून पहा, यामुळे आपला उन्हाळा थोडा आरामदायी ठरेल, अशी आशा आम्ही करतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button