स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्वेस्टमेंट सुरू करण्यासाठी आपल्याला गरज असते ती एका ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ची. ट्रेडिंग अकाउंट द्वारे आपण स्टॉक खरेदी किंवा विक्री करू शकता आणि डिमॅट अकाउंट मध्ये आपण खरेदी केलेले स्टॉक ठेवू शकता.
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करावी? | How to start trading and investing in the stock market?
सर्वात प्रथम आपल्याला निवडायचा आहे तो एक चांगला ब्रोकर. जर आपण नवीन असाल तर आपण डिस्काउंट ब्रोकर पासून सुरुवात करावी पण तो डिस्काउंट ब्रोकर भरवशाचा सुद्धा असला पाहिजे. भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारा डिस्काउंट ब्रोकर म्हणजे झिरोदा (Zerodha).
आपण ब्रोकरच्या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये एक बेसिक फॉर्म भरून एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर आपल्याला ब्रोकर कडून कॉल येतो आणि ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट उघडणे संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, सॅलरी स्लिप, फॉर्म 16 किंवा सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणे गरजेचे आहे.
अकाउंट उघडण्याची सर्व प्रोसेस ही आजकाल ऑनलाइन पद्धतीने केली जाते. वर दिलेले सर्व डॉक्युमेंट आपण आपल्या मोबाईल द्वारे स्कॅन करून किंवा त्याचा फोटो काढून अपलोड करू शकता. त्यानंतर एका व्हिडिओ कॉल द्वारे आपल्या डॉक्युमेंट्स चे आणि आपले व्हेरीफिकेशन केले जाते. व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर साधारणतः एक ते दोन दिवसांमध्ये आपले ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट उघडले जाते. हे अकाउंट उघडल्यानंतर काही ब्रोकर POA नावाचा एक फॉर्म फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून ती कुरियर द्वारे आपल्या हेड ऑफिस ला पाठवायला सांगतात. ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी साधारणतः तीनशे रुपयांपर्यंत खर्च येतो. काही ब्रोकर्स अकाउंट ओपनिंग साठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावत नाहीत.
अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला वर्षाला त्याचे AMCचार्जेस द्यावे लागतात. हे चार्जेस साधारणतः तीनशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत असतात आणि हे चार्जेस सर्वस्वी त्या ब्रोकर वर अवलंबून असतात.जर आपले ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट जर यशस्वीपणे ओपन झाले तर ब्रोकर कडून आपल्याला ई-मेलद्वारे कळवले जाते. ई-मेल मध्ये आपला युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असतो त्याच प्रमाणे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची लिंक सुद्धा दिलेली असते. या युजरनेम पासवर्ड द्वारे आपण ट्रेडिंग अकाउंटला लॉगिन करू शकता.
लॉग इन केल्यानंतर जर आपल्याला शेअर खरेदी विक्री करायचे असेल तर आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागतात. आपल्या बँक अकाउंट मधून ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे बरेच मार्ग आहेत त्यापैकी नेट बँकिंग आणि यूपीआय हे सर्वात प्रचलित मार्ग आहेत. ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आपला बॅलन्स लगेच अपडेट केला जातो आणि आपण आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये किती रक्कम आहे ते लगेच पाहू शकता.
जर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मधील रक्कम आपल्या बँक अकाउंट वर ट्रान्सफर करायचे असेल तर त्यासाठी आपल्या ब्रोकरच्या वेबसाईटवर किंवा ट्रेडिंग टर्मिनलवर पर्याय दिलेला असतो. आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करताना ते लगेच होतात पण ट्रेडिंग अकाउंट मधून बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करताना आपल्याला एक ते दोन दिवसांचा अवधी लागू शकतो.
आपल्या ट्रेडिंग टर्मिनल लॉगिन केल्यानंतर आपण सर्च बार मध्ये आपल्याला पाहिजे तो स्टॉक सर्च करू शकता. तो स्टॉक खरेदी आणि विक्री करण्याचे ऑप्शन तेथेच आपल्याला दिसून येते त्यावर क्लिक करून आपण स्टॉक ची खरेदी किंवा विक्री करू शकता.
जर आपण इंट्राडे साठी खरेदी करत असाल तर खरेदी करतेवेळी आपल्याला इंट्राडे हे ऑप्शन निवडावे लागते. इंट्रा डे साठी ब्रोकर कडून आपल्याला काही मार्जिन दिले जाते ते प्रत्येक ब्रोकर चे वेगवेगळे असते. म्हणजे जर आपल्या अकाउंट मध्ये एक लाख रुपये असतील आणि ब्रोकरणे आपल्याला दहापट मार्जिन दिले तर आपण दहा लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करु शकता. पण इंट्राडे मध्ये खरेदी केलेले शेअर्स त्याच दिवशी विकणे हे बंधनकारक असते. जर आपण ते विकले नाहीत तर आपला ब्रोकर मार्केट बंद होताना ते स्वतः विकून टाकतो आणि त्याचा प्रॉफिट किंवा लॉस आपल्या अकाउंट मध्ये दिसू लागतो.
जर आपल्याला काही दिवसांसाठी शेअर्स घेऊन ठेवायचे असतील तर आपल्याला CNC नावाचा पर्याय निवडावा लागतो. हा पर्याय निवडल्यानंतर आपण घेतलेले शेअर्स दुसऱ्याच दिवशी आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जातात जी आपण कितीही दिवसांपर्यंत होल्ड करू शकता. जर आपण CNC नावाचे ऑप्शन निवडले तर आपल्याला ब्रोकर कडून मार्जिन दिले जात नाही. पण यामध्ये काही ब्रोकर हे अपवाद आहेत.
आपण स्टॉप मध्ये ट्रेडिंग मोबाईल द्वारे किंवा कॉम्प्युटर लॅपटॉप द्वारे करू शकता. त्यासाठी मोबाईल मध्ये ब्रोकर चे ट्रेडिंग एप्लीकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे. लॅपटॉप साठी आपण वेब ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरू शकता किंवा आपल्या डेस्कटॉप वर सॉफ्टवेअर डाऊनलोड सुद्धा करू शकता. बरेचसे ब्रोकर हे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे अतिरिक्त चार्जेस घेत नाहीत. नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर ते कसे वापरायचे याचा डेमो ब्रोकर कडून मोफत दिला जातो.
आपण खरेदी केलेल्या स्टॉक वर आपल्याला ब्रोकरेज द्यावे लागते. हे ब्रोकरेज प्रत्येक ब्रोकर चे वेगवेगळे असते ते आपल्याला ब्रोकर च्या वेबसाईटवर प्राईसिंग नावाचे ऑप्शन वर करू शकते. जर आपले अकाऊंट फुल-सर्वीस ब्रोकरकडे असेल तर आपल्याला ब्रोकरेज हे जास्त द्यावे लागते पण आपले अकाऊंट जर डिस्काउंट ब्रोकर कडे असेल तर तुलनेने आपल्याला कमी ब्रोकरेज द्यावे लागते.
आपण खरेदी केलेल्या स्टॉक वर ब्रोकरेज व्यतिरिक्त काही गव्हमेंट टॅक्सेस सुद्धा द्यावे लागतात याला STT असे म्हणतात या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही प्रकारचे टॅक्सेस आपल्याला द्यावे लागतात.आपण जर स्टॉक मार्केट मधून रेगुलर इन्कम करत असाल तर आपल्याला या प्रॉफिट वर इन्कम टॅक्स सुद्धा द्यावा लागतो. पण जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला तर इन्कम टॅक्स मध्ये सवलत देखील मिळते. हा पर्याय बऱ्याच कमी जणांना माहित आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या CA शी संपर्क साधू शकता.
Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.