आपल्या पाल्याच्या (मुलांच्या) उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करताना काय काळजी घ्याल.

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी पालक नेहमी प्रयत्नात असतात. आपल्या पाल्याच्या भविष्यातील गरजा विनाअर्थाळा पूर्ण व्हाव्या यासाठी योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय पालक नेहमी शोधत राहतात. यासाठी पालक चाइल्ड इन्शुरन्स किंवा चाइल्ड इन्व्हेस्टमेंट यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. मात्र काही वेळा घाई गडबडीत पालक काही चुका करतात परिणामी त्यांना कमी परतावा मिळतो.

आपल्या पाल्याच्या (मुलांच्या) उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करताना काय काळजी घ्याल| How to secure your child’s financial future

आजच्या आधुनिक काळात शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत पैशाची गरज आहे. त्यामुळे योग्य गुंतवणुकीच्या माध्यमातून 10-15 वर्षे अगोदर नियोजन केले तर चांगला निधी जमवता येतो. त्यामुळे पॉलिसी घेतलेल्यांनी लक्षात ठेवावे की तो किती प्रमाणात जोखीम घेण्यास सक्षम आहे. तसेच जोखीम जितकी जास्त प्रमाणात तितक्या जास्त प्रमाणात परतावा हे देखील खरे आहे. परंतु योजना समजून न घेता तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता समजून घेतली पाहिजे.

त्यामुळे जोखीम घेण्याची क्षमता समजून घ्यायची असेल तर महागाई दर देखील लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या गुंतवणुकीत पाच किंवा दहा वर्षानंतर तुमच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चात महागाईचा दर जोडला पाहिजे. ही गोष्ट आपण एका उदाहरणासह समजून घेऊया.

समजा आजच्या काळात एका कोर्सेची फी 10 लाख रुपये आहे. पण येत्या 10 किंवा 15 वर्षांनी या 10 लाखाची किंमत दरवर्षी 5 टक्के दराने वाढले. म्हणून त्यानुसार त्या वेळेला तुमच्या मुलाच्या अभ्यासासाठी तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील. आजच्या 1 लाखाची किंमत किती होईल त्यानुसार पालकांनी गुंतवणूक करावी.

पाल्याच्या संगोपनाच्या गुंतवणुकी सोबतच पाल्यांच्या विमा योजना घेण्यापूर्वी पालकांनी स्वतःच्या विमा काढावा. तुमचा मृत्यू झाल्यास विम्याचा मृत्यू लाभ संपूर्ण कुटुंबाला आर्थिक मदत करेल. तुम्ही तुमचा स्वतःचा विमा घेतल्याने तुमच्या कुटुंबाला संकटाच्या वेळी खूप मदत होते. लक्षात ठेवा स्वतःसाठी विमा खरेदी केल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला आधार मिळू शकतो. त्यानंतर पालकाने चाइल्ड इन्शुरन्स योजनेत गुंतवणूक केली पाहिजे.

तसेच तुमच्या पाल्याच्या भविष्यातील गरजा आणि पॉलिसीची मुदत यांच्याशी जुळणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला 15 वर्षानंतर उच्च शिक्षणासाठी पैसे गोळा करायचे असतील तर 15 वर्षापेक्षा कमी किंवा जास्त कालावधीची पॉलिसी मुदत निवडून काही फायदा होणार नाही. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर, गुंतवणुकीला उशीर करू नका. कारण गुंतवणुकीला उशीर करणे ही सर्वात सामान्य चूक आहे. तुम्ही गुंतवणुकीत जेवढा उशीर कराल तितका तुमचा परतावा कमी होईल.

उदाहरणार्थ, समजा जर तुम्ही तुमच्या पाल्याच्या जन्मापासून दर महिन्याला 10 हजार रुपये गुंतवले आणि तुम्हाला पंधरा टक्के परतावा मिळत असेल तर तुमचे मूल वीस वर्षाचे होईपर्यंत त्याला 1.33 कोटी रुपये सहज मिळतील.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button