निष्क्रिय जीवनशैलीचे दुष्परिणाम व उपायाबद्दल तुम्हाला माहित आहे का? | How to prevent physical inactivity

आपणास हे ठाऊक आहे का? बैठी जीवनशैलीमुळे दरवर्षी सुमारे 20 लाख लोकांचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे जागतिक स्तरावरील विकसित आणि विकसनशील देशांमधील 85 टक्के लोक बैठी जीवनशैली जगतात. विशेष म्हणजे प्रौढच नाही तर सुमारे दोन तृतीयांश मुलांचाही यात समावेश आहे.

जाणून घेऊयात निष्क्रिय जीवनशैलीचे दुष्परिणाम व उपायाबद्दल | How to prevent physical inactivity

शारीरिक आणि मानसिक आरोग्य

सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे हृदय व मूत्रपिंडाचे आजार जडतात. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल वाढणे, ऑस्टिओपोरोसिस कोलन कॅन्सर आणि पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो. विशेष म्हणजे शारीरिक हालचाल शून्य झाल्यास सेरोटोनिनचे उत्सर्जन कमी होते. ज्यामुळे नैराश्य येते.

याप्रकारे सुधारा जीवनशैली

कार्यालयात काम करणाऱ्यांनी जेवणाच्या वेळेत तसेच चहा पिण्याच्या ब्रेकदरम्यान पायी चालावे तसेच प्रत्येक तासाला खुर्चीवरून उठून थोडा फेरफटका मारून यावा. फोनवर बोलायचे असल्यास एका जागी बसून न बोलता, चालता चालता बोलावे.

हे सुध्दा वाचा:- ऑफिसमध्ये काम करताना कंटाळा येतोय, मग या टिप्स नक्की फॉलो करा

याप्रकारे सुधारा मुलांची जीवनशैली

घरातील मुले मोबाईल तसेच टीव्ही समोर बसून वेळ घालवत असतील तर पालकांनी मुलांचा हा वेळ मर्यादित करावा. पालकांनी मुलांना कला मैदानी खेळासाठी प्रोत्साहित करावे. विशेष म्हणजे पालकांनी मुलांना घरातील लहान मोठे कामे करायला लावावी.

घरातील गृहिणीसाठी जीवनशैली

घरातील गृहिणी संपूर्ण दिवस घरकाम आणि आरामात घालवत असेल तर घरातील लहान सहान वस्तू घेण्यासाठी घराजवळील दुकानात चालत जा. गृहिणींनी घरातील जी कामे मशीन शिवाय करणे शक्य आहे. अशा कामांसाठी शारीरिक कष्ट करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ