नातेवाईक- मित्रांना कर्ज देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्यात | How to lend money to a friend legal in India

आजच्या दैनंदिन व्यवहारात पैशांची गरज कधी कोणाला पडेल सांगता येत नाही. परिणामी पैशांच्या अभावी नातेवाईक किंवा मित्र यांच्यामध्ये छोटे-मोठे आर्थिक व्यवहार अर्थात लेंडिंग मनी (lending money) होत असतात. या प्रकारचे व्यवहार कायदेशीर असतात. मात्र या प्रकारची व्यवहार करत असताना फसवणूक होऊ नये किंवा आपसातील संबंध खराब होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणून परिणामी या प्रकारचे व्यवहार करताना तज्ञांच्या मते कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात यावर एक नजर टाकूया.

नातेवाईक- मित्रांना कर्ज देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्यात | How to lend money to a friend legal in India

शक्यतो या प्रकारची व्यवहार आपण नातेवाईका सोबत असलेल्या संबंध तसेच मित्रांशी असलेले संबंध लक्षात घेऊन परिचित लोकांना कर्ज म्हणून आपण काही पैसे देतो. मात्र या प्रकारच्या व्यवहारात आपण समोरच्या व्यक्तीला राग येईल म्हणून आपण त्यांचा कायदेशीर पुरावा देखील घेत नाही. मात्र या प्रकारच्या व्यवहारात लीगल डॉक्युमेंट नसेल तर हे कर्ज गिफ्ट म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते. म्हणजे नंतर पैसे देण्यास मित्र किंवा नातेवाईकांनी नकार दिल्यास तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे या प्रकारच्या व्यवहारात लेखी करार करण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास या प्रकारच्या व्यवहारात स्टॅम्प पेपरवर आपआपसात कायदेशीर करार करण्याचा प्रयत्न करा. हा व्यवहार एक दस्तावेज बनवण्यासाठी आणि तुमचे आपसातील संबंधाचे रक्षण करण्यासाठी कर्जाची रक्कम, परतफेडीची मर्यादा, व्याज यांसारख्या तपशीलांचा उल्लेख करा.

या प्रकारची कर्ज देताना रोख व्यवहार करण्याऐवजी नेहमी बँक ट्रान्सफर पर्यंत वापर करावा. तसेही 20 हजारावरील पुढील रोखीचे कर्ज व्यवहार तर मानलेच जात नाही. आयकर विभागाच्या नियमानुसार 20000 पेक्षा जास्त रक्कम रोखीने उधार देणे किंवा घेण्याची परवानगी नाही. तुम्ही या आदेशाचे पालन न केल्यास आयकर विभाग तुमच्याकडून दंड देखील आकारू शकतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहार 50 हजारांच्या वरती असेल आणि त्याचे लीगल डॉक्युमेंट तयार केलेली नसेल तर आयकर विभाग याला गिफ्ट समजून यावर कर ही लावू शकतो.

यापासून बचाव करण्यासाठी हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला पोस्ट- डेटेड अकाउंट पेय चेक तुमच्या नावाने देण्यास सांगू शकता. जर तुमच्या मित्राचा चेक निर्धारित तारखेला बाऊन्स झाला तर तुम्ही ताबडतोब कायदेशीर कारवाई करू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ