शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात? | How to invest in the stock market in marathi

मित्रांनो, आज आपण शेअर्स बाजार मध्ये गुंतवणूक कशी करतात? याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही सर्व माहिती ज्ञानशाळा या वेबसाईटवर मिळणार आहे. या मध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शेअर मार्केट बद्दल जाणून घेणार आहोत.

शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात? | How to invest in the market?

शेअरबाजारामध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत.

प्राथमिक बाजार (primary market) आणि दुय्यम बाजार (secondary market). यांपैकी पहिला मार्ग म्हणजे थेट कंपनीकडून खरेदी करणं. ज्या वेळी एखादी कंपनी शेअरबाजारात आपल्या शेअरचा ‘पब्लिक इश्यू आणते, त्या वेळी अशी खरेदी शक्य असते. तर दुसऱ्या प्रकारात ज्यांच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर असतील अशा लोकांकडून ते खरेदी करावे लागतात.

शेअर खरेदी करायच्या या दोन मार्गाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. सुरुवातीला प्राथमिक बाजार म्हणजेच प्रायमरी मार्केटबद्दल माहिती घेऊयात. ज्या वेळी एखादी नवीन कंपनी शेअरबाजारात पहिल्यांदा आपले शेअर्स लोकांना देऊ करते त्या वेळी त्या पद्धतीला ‘इनिशिअल पब्लिक इश्यू’ अर्थात ‘आयपीओ’ (IPO) म्हणतात.

काही वेळेस बाजारातील एखादी जुनी कंपनी (जिचे जुने शेअर्स आधीपासूनच शेअरबाजारात उपलब्ध आहेत) नव्याने शेअर इश्यू करते तेव्हा त्या पद्धतीला ‘फॉलो-ऑन पब्लिक ऑफर्स’ अर्थात ‘एफपीओ’ (FPO) म्हणतात. अशा आयपीओ किंवा एफपीओच्या वेळेस प्रत्येक व्यक्तीला शेअर खरेदी करणं जमेलच असं नाही. काही वेळेस अशी शेअर खरेदी करण्याची इच्छा असूनही त्या शेअरच्या संख्येपेक्षा मागणी अधिक असल्याने प्रत्येकाला शेअर मिळतीलच असं नाही. अशा स्थितीस ‘ओव्हर सबस्क्रिप्शन’ म्हणतात.

मग असे लोक दुय्यम बाजारातून म्हणजेच सेकंडरी मार्केटमधून इतर लोकांकडून शेअर खरेदी करतात. जगभरात असे सेकंडरी बाजारातून शेअर खरेदी-विक्रीची सुविधा उपलब्ध करून देणारे अनेक शेअरबाजार आहेत.

उदाहरणार्थ : न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज (New) York Stock Exchange- NSE), नॅसडॅक स्टॉक मार्केट (NASDAQ), लंडन स्टॉक एक्सचेंज (London Stock Exchange LSE), टोकिओ स्टॉक एक्सचेंज (Tokyo Stock Exchange -TYO), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange -BSE), सिंगापूर स्टॉक एक्सचेंज (Singapore Exchange Ltd- SGX) इत्यादी.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Shares_Dnyan आणि Dnyan_shala या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button