आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि चुकीच्या आहारामुळे आपल्याला अनेक आजार होण्याचा धोका आहे. शरीरातील रक्ताची कमतरता ही अशीच एक समस्या आहे.
शरीरात रक्ताची कमतरता आहे? | How to increase hemoglobin in marathi
रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरासाठी आणखी अनेक समस्या उद्भवू शकतात.या आजारांकडे जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, थकवा यासारखी लक्षणे आपल्या जाणवू शकतात. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता असल्यास आपल्या आहारात या काही पदार्थांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे.या पदार्थांमुळे नैसर्गिकरित्या तुमच्या रक्त वाढतं आणि अन्य समस्या पण दूर होतात.
बीट
बीटमध्ये थोड्या प्रमाणात लोह आणि फॅलिक एसिड असते. त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. याकरिता तुम्ही दररोज तुमच्या आहारात बीटच सेवन करा. रक्त वाढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे रोज सकाळी 1 कप बीटचा रस नक्की घ्या.
पालक
शरीराचे कार्य नीट आणिसुरळीत ठेवण्यासाठी शरीरात रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. याकरिता तुमच्या आहारात पालकाचा समावेश करा. पालकमध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. या करिता नियमित पालकचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. त्याचबरोबर मानसिक तणाव देखील दूर होतो.
सफरचंद
दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर होतात असं म्हणतात. यामुळे आपण सगळ्यांनी आजार दूर ठेवण्यासोबतच सफरचंद खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.
डाळिंब
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे आपल्या शरीरात रक्त तयार करण्यासाठीचे आवश्यक घटक तयार होतात. डाळिंब खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.
टोमॅटो
टोमॅटोचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची पातळी वाढते. टोमॅटोचे सॅलड किंवा भाजी मध्ये समावेश करा. तुम्ही काही दिवस सकाळी 3 ते 4 टोमॅटोचा ताजा रस करून घ्या किंवा तुम्ही ते सूप बनवून प्या. यामुळे तुम्हाला रक्ताची कमतरता भासणार नाही. मात्र ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी टोमॅटोच अधिक प्रमाणात सेवन करू नये.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.