iOS 16.4 या व्हर्जनमध्ये व्हॉइस आयसोलेशन फिचर चालू करायच आहे, मग या स्टेप्स फॉलो करा |How to enable voice isolation on iphone follow this step in marathi

मित्रांनो Apple ने सर्व iPhones साठी नवीन iOS 16.4 अपडेट जारी केले आहे. यात नवीन इमोजी, सुधारित क्रॅश डिटेक्शन फीचर, व्हॉईस-ओव्हर सपोर्टसह हवामान ॲप अपडेट, सफारीसाठी पुश नोटिफिकेशन, पॉडकास्ट इंटरफेस अपडेट यासारखी अनेक मनोरंजक फिचर सादर केली आहेत.

iOS 16.4 या व्हर्जनमध्ये व्हॉइस आयसोलेशन फिचर चालू करायच आहे, मग या स्टेप्स फॉलो करा |How to enable voice isolation on iphone follow this step in marathi

यापैकी तुमच्या iPhone कॉल्ससाठी खरोखर एक उपयुक्त अस फीचर आहे जे तुम्हाला गर्दीच्या ठिकाणीही असला तरी तुम्हाला स्पष्ट फोन कॉल करता येते. हे फिचर वापरण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमचा फोन अपडेट करणे आवश्यक आहे. चला तर पटकन जाणून घेऊया या फिचरला कस ऍक्टिव्हेट करायचं.

Apple चे व्हॉईस आयसोलेशन फीचर काय आहे?

मित्रांनो तुम्ही आता सेल्युलर कॉलसाठी तुमच्या iPhone वर व्हॉइस आयसोलेशन फिचर वापरू शकता. ते वापरण्यापूर्वी, तुम्हाला तुमचा iPhone iOS 16.4 व्हर्जन अपडेट करणे आवश्यक आहे. यापूर्वी, ऍपलने व्हॉईस आयसोलेशन फिचरचा वापर फेसटाइम आणि व्हॉट्सॲप सारख्या ॲप्सद्वारे केलेल्या VoIP कॉलसाठी मर्यादित केला होता.

हे तुम्हाला काही इअरबड्समध्ये असणाऱ्या अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनप्रमाणेच काम करते. आयफोनवर व्हॉईस आयसोलेशन फिचर सक्रिय केल्याने डिव्हाइसचा मायक्रोफोन स्पीकरच्या आजूबाजूचा कोणताही पार्श्वभूमी आवाज फिल्टर करतो आणि कॉलच्या दुसऱ्या बाजूला प्रसारित होण्यापासून प्रतिबंधित करतो.

हे सुध्दा वाचा:- Incognito mode म्हणजे काय, तुमची शोध हिस्टरी किती सुरक्षित आहे?

या स्टेप्स फॉलो करून व्हॉईस आयसोलेशन हे फिचर चालू करु शकता

  • स्टेप्स 1: सर्व प्रथम आयफोन ॲप उघडा आणि नंतर कोणत्याही व्यक्तीला कॉल करा.
  • स्टेप्स 2: जेव्हा तुम्ही कॉलवर असता, तेव्हा फक्त आयफोन स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातून नियंत्रण केंद्र खाली खेचा.
  • स्टेप्स 3: तेथे, माइक मोड बटणावर टॅप करा.
  • स्टेप 4: हे माइक मोड सेटिंग उघडेल, जिथे तुम्हाला व्हॉइस आयसोलेशनचा पर्याय मिळेल.त्यावर टॅप करा आणि व्हॉइस आयसोलेशन चालू करा.
  • स्टेप्स 5: त्याचप्रमाणे, जर तुम्हाला आवाज आणि तुमच्या सभोवतालचे सर्व आवाज ऐकायचे असतील तर तुम्ही ‘वाइड स्पेक्ट्रम’ निवडू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला (How to enable voice isolation on iphone follow this step in marathi) ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button