गुगलकडे असणारी आपली माहिती कशी करावी डिलीट? | How to delete google history in marathi

आपल्याला आयुष्यात बरचसे प्रश्न पडतात. पण त्याची उत्तरं शोधणं पूर्वीपेक्षा जरा सहज शक्य झालं आहे. का म्हणाल तर त्रिकालज्ञानी गुगल आपल्या मुठीत असतात. सध्या त्यांच्याशिवाय आपल्यापैकी बहुतेक लोकांचं पान हलत नाही. ते आपल्याला जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देतात. पण … पण काय? ते आपल्याला उत्तरं देताना आपला सगळा कच्चा चिठ्ठा स्वतःकडे जमा करत असतात. म्हणजे काय? तर तुम्ही सगळ्यात जास्त काय सर्च करता?, तुम्ही कुठे कुठे जाता? तुमच्या आवडीच्या गोष्टी कोणत्या? हे सगळं या सर्वज्ञानी गुगल ला माहीत असतं. पण आपण त्यांच्याकडे असणारी ही माहिती नाहीशी करू शकतो. कशी काय? चला तर जाणून घेऊया.

गुगलकडे असणारी आपली माहिती कशी करावी डिलीट? | How to delete google history in marathi

आपल्याला माहीत आहे की गुगल हे एक सर्च इंजिन आहे. याहू, ऑपरा अशी इंजिन्स असून सुद्धा गुगलची लोकप्रियता अफाट आहे. आपण इंटरनेट विविध वेबसाईट्स वर गेल्यावर तिथे आपल्या काही ठिकाणी बरोबर खुणेवर क्लीक करावं लागतं म्हणजे ते कारारनामे असतात. त्याला आपल्याला मान्यता द्यावी लागते. गुगल लॉगिन करताना आपल्यालाही असंच बरोबर खुणेवर क्लिक करावं लागतं. आणि आपली माहिती गुगलकडे साठवली जाते.

डिलीट कोण- कोणते पर्याय आहेत?

My Activity

आपण इमेल वरून गुगल वर लॉगिन करतो. त्यामुळे गुगलवर जे काही करू ते या इमेलच्या माध्यमातून ते गुगलवर साठवलं जात असतं. तुम्ही केलेल्या एका सर्च पासून ते तुम्ही ज्या ठिकाणांना भेट दिली आहे. अशी सगळी माहिती गुगल स्वतःकडे ठेवते. ही माहिती गुगलच्या माय ॲक्टिव्हिटी या फोल्डरमध्ये साठवली जाते. तुम्ही ज्या तारखेला जे केलं आहे, त्या तारखेप्रमाणे इथे माहिती सेव्ह झालेली असते. तर आपण काय करायचं? आपल्याला कोणती ठराविक दिवशीची ठराविक माहिती नको आहे ते पाहून आपण ती माहिती नाहीशी करू शकता. किंवा सगळीच माहिती नको आहे, तर तिथेच असणारे ‘ऑल टाईम’ व ‘ऑल प्रॉडक्ट्स’ हे पर्याय पहा आणि त्यावर क्लिक करून माहिती डिलीट करा. यामुळे आपण आधी भूतकाळात जे काही सर्च केलं आहे, ती सगळी माहिती म्हणजेच सर्च हिस्टरी व तुम्ही इंटरनेटवर ज फेरफटका मारला आहे त्या संबंधीची माहिती म्हणजे ब्राऊजिंग हिस्टरी अशा दोन्ही प्रकारच्या माहिती डिलीट होतील. पुन्हा आपण गुगल बाबांकडून सेवा घ्यायला मोकळे असतो.

गुगलची Location history

आपण बहुतेक जण अँड्रॉइड फोन वापरतो. त्या फोनमध्ये बऱ्याच ॲप्ससाठी आपलं लोकेशन आवश्यक असतं. त्यामुळे आपल्याला मोबाईल मधील लोकेशन हा पर्याय सतत चालू ठेवावा लागतो आणि गुगलकडे आपली ही फिरस्तीची माहिती जात असते. तर ती माहिती आपल्याला द्यायची नसेल तर काय करावं? लोकेशन हा पर्याय पहिल्यांदा बंद ठेवावा. गुगलकडे ही लोकेशनची माहिती डिलीट कशी करायची? तर तिथेही ठराविक दिवस व ठराविक ठिकाणी दिलेली भेट आपल्याला नको असेल तर तेवढीच आपण हटवू शकतो. किंवा सगळी माहिती डिलीट करू शकतो. ती माहिती मिळते कुठे तर लोकेशन ॲप मध्ये ‘वेस्ट बास्केट’ चा पर्याय आहे. तिथे ही माहिती मिळते.

YouTube ची माहिती

गुगलसोबत आपण आता युट्युबचेही मोठे शौकीन झालो आहोत. सतत व्हिडिओज् किंवा रिल्स बघण्याचा नाद जडलेला असतो. युट्युबला दुसरा पर्याय नाही. इथे मनोरंजन, माहिती सगळ्याचा खजिना असतो. आता गुगल बाबांचा तिसरा डोळा इथंही लागून असतो. ते इथली माहिती स्वतःकडे ठेवतात. इथलीही माहिती तुम्हाला त्यांना द्यायची नसेल तर तीही सोय आहे. युट्युबच्या लायब्ररीमध्ये हिस्टरी नावाचा पर्याय आहे. तिथे गेल्यावर ‘क्लिअर ऑल सर्च हिस्टरी’ किंवा ‘क्लिअर ऑल वॉच हिस्टरी’ हे पर्याय पाहून आपण त्यातली हवी ती किंवा सगळी माहिती नष्ट करू शकतो.

जाहिरातदारांकडे असलेला माहितीचा साठा

कुठले जाहिरातदार आले मध्येच? असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल बरोबर ना? अहो ते नाही का व्हिडिओ बघताना किंवा माहिती वाचतानामध्येच अशा जाहिराती येत असतात. आलं का लक्षात? तर त्या कशा येतात? गुगलबाबा त्यांना सांगतात की, ही व्यक्ती जे सर्च करते, त्याच प्रकारच्या जाहिराती त्या व्यक्तीला दाखवल्या जाव्यात. म्हणून युट्युब, असो फेसबुक आपण तिथे या जाहिराती पाहतो. तर ही माहिती शोधण्यासाठी आपण गुगल ओपन केल्यानंतर आपल्या ईमेल आयडीच्या खाली ‘मॅनेज युअर गूगल अकाऊंट’ असा पर्याय दिसतो, त्यावर क्लिक करून आपण आत गेलो की ‘प्रायव्हसी अँड पर्सनालायझेशन’ हा पर्याय दिसतो त्यावर क्लिक केलं की आपल्याला ‘ॲड सेटिंग्ज’ हा पर्याय दिसतो, त्यावर क्लिक करून आपण ही माहिती डिलीट करू शकतो. म्हणून आजच्या काळात जर काळासोबत पावलं टाकायची असतील तर गुगल वर भरवसा ठेवा पण त्याला माहिती किती होऊ द्यावी तितकीच होऊ द्या. आणि त्याच्या चाव्या तुमच्याच हातात आहेत.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ