डेंग्यू ,ताप पासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा.

पावसाळा सुरू झाला की, आजार येणार त्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार नक्की असतात.डेंग्यूमध्ये ताप येतो आणि विकनेस प्रचंड जाणवतो. डेंग्यू झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. अशा परिस्थितीत जर डेंग्यूच्या रुग्णांनी योग्य आहार घेतला नाही तर त्याचा धोका वाढू शकतो. योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घेऊन डेंग्यू बरा होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला कोण कोणता आहार घ्यायचा ते सांगणार आहोत.

आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा | Dengue fever prevention: Immunity boosting foods

नारळ पाणी

नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. डेंगू झाल्यावर काही खाऊ किंवा पिऊ वाटत नाही. अशावेळी नारळाचे पाणी या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

पपईचा रस

पपईची पाने नीट धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर, एक पपई घ्या आणि बारीक कापून घ्या. आता त्यात लिंबाचा रस आणि अर्धा कप संत्र्याचा रस मिक्स करा. आणि त्यानंतर या थोडं पाणी घालून रस तयार करा. आणि विशेष म्हणजे हा रस नेहमी फ्रेश प्या. काहींना अशी सवय असते की, एकदाच सरस काढून ठेवतात आणि रोज थोडं थोडं पितात. असं करू नका.

डाळिंबाचा रस

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंबामध्ये नैसर्गिकरित्या खनिजे असतात. जी शरीराला ऊर्जा देण्याचे काम करत असतात. यामध्ये लोहचे भरपूर प्रमाणात असते. जे प्लेटलेट वाढवण्यास मदत करते. हे झालं आहाराबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत डेंगू आणि मलेरिया पासून कसा बचाव करता येईल.

हे वाचा- हृदयविकार, रक्तदाब आणि स्नायुशैथिल्य यांना स्वतःहून निमंत्रण का देता ?

अशा प्रकारे डेंग्यू आणि मलेरियाच्या डासापासून बचाव करा.

  • कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम भांड्यात पाणी जमा करू ठेवू नका. यामध्ये डेंग्यू-मलेरियाच्या डासांची पैदास सुरू होते.
  • टेरेसमध्ये किंवा बागेत सर्व कंटेनर किंवा रिकामी भांडी झाकून ठेवा. किंवा त्याला उलटे ठेवू शकता. याशिवाय पाणी असलेली भांडी स्वच्छ ठेवा.
  • घरातून बाहेर पडताना पूर्ण बाहीचे कपडे घाला.ज्यामुळे डासांचा संपर्क कमी होईल.
  • डास टाळण्यासाठी फवारण्या, क्रीम आणि जाळी वापरा. जर तुम्ही बाहेरच्या खोलीत झोपत असाल तर मच्छरदाणी नक्की वापरा.
  • संध्याकाळच्या वेळी दरवाजे आणि खिडक्या बंद करा.
  • खूप महत्त्वाचं म्हणजे,विनाकारण फिरणे टाळा. खूप महत्त्वाचं असेल तेव्हाच बाहेर पडा. असे केल्याने तुम्ही डेंग्यूचा धोका कमी करू शकता.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button