पिरीयड्समध्ये पॅड किती वेळाने बदलावा? How Often Should I Change My Feminine Pad?

आज आपण खुप महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो मी पाहिलेच सांगतो पोस्ट नक्की शेअर करा. पिरीयड्स येणं ही महिलांच्या आरोग्याची एक सामान्य परंतु महत्वाची प्रक्रिया आहे.

पीरियड्स दरम्यान, महिलांनी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची अधिक काळजी घेतली पाहिजे. या कालावधी दरम्यान, स्त्रियांच्या मनात एक प्रश्न नेहमीच येतो की, मासिक पाळीदरम्यान नेमकं किती तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलला पाहिजे?तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकाच पॅडचा वापर बराच काळ केल्यास योनी मार्ग आणि त्याच्या सभोवतालच्या त्वचेला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी पिरीयड्समध्ये योग्य वेळी पॅड बदलले पाहिजे.

दिवसातून किती वेळा पॅड बदललं पाहिजे? How Often Should I Change My Feminine Pad?

पिरीयड्सच्या दिवसात महिलांनी किती वेळा पॅड्स बदलावं? याबद्दल कोणतीही निश्चित उत्तर नाही. कारण हे पिरीयडमध्ये होणार्‍या रक्ताच्या प्रवाहावर अवलंबून असते. साधारणपणे, महिलेचा कालावधी एकूण 7 ते 8 दिवस असतो, त्यापैकी पहिल्या 2 ते 3 दिवस रक्तस्त्रावाचा प्रवाह जास्त असतो. त्यामुळे पॅड कधी बदलावं हे स्तियांवर अवलंबून असतं.

American College of Obstetricians and Gynecologistsच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळी दरम्यान सामान्य रक्तस्त्राव होत असल्यास स्त्रियांनी 4 ते 8 तासांनंतर पॅड बदललं पाहिजे.

पीरियड्स दरम्यान कसे सॅनिटरी पॅड वापरावे?

मार्केट मध्ये विविध प्रकारचे सॅनिटरी पॅड उपलब्ध आहेत. आपण आपल्या गरजेनुसार पॅड निवडू शकता. परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कॉटनचे पॅड वापरावे. सुगंधित आणि फॅन्सी मटेरियलपासून बनवलेल्या पॅडमुळे संसर्ग होऊ शकतो. सॅनिटरी पॅडचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत-

  1. रेग्युलर पॅड (Regular Sanitary Pad )
  2. मॅक्सी पॅड (Maxi pad)
  3. सुपर पॅड (Super pad)
  4. अल्ट्रा थीन पॅड (Ultra thin pad)
  5. ओवर नाईट पॅड (Over Night Pad)

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button