मुलांना सुद्धा प्रायव्हसी हवी, एकदा नक्की वाचा…

अमेरिकेसारख्या देशात मुलं अठरा वर्षाची झाली की मुलांचे निर्णय मुलांनाच घेण्याची मुभा असते. किंवा मुलांना गरज असेल तर काही बाबतीत पालक त्यांना मार्गदर्शन देतात. या सगळ्या गोष्टी आपल्या भारतात पालकां समोर आपण मांडल्या तर जवळजवळ सगळ्यांच्याच भुवया वर होतील. कारण आपल्याकडे या गोष्टी न पटणाऱ्या आहेत. आपल्या इथले सगळेच पालक हे म्हणतील की एवढं मुलांना मोठं करायचं आणि नंतर त्याच्या बाबतचे सगळे निर्णय त्यांच्यावरच सोपवायचे? आपलं घर असताना मुलांना बाहेर राहण्याची परवानगी द्यायची हे काही आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही.

मुलांना सुद्धा प्रायव्हसी हवी | How much privacy should a child have

पण मुलांकडून अनेकदा अशी तक्रार असते की आम्हाला स्वतःला स्वतःसाठी काही वेळ हवा असतो किंवा काही निर्णय स्वतः घेण्याचं स्वतंत्र्यं हवं असतं. पण आपले पालक या गोष्टी जुमानत नाहीत. त्यांना आपल्या मुलांनी प्रत्येक गोष्ट सांगावी असं वाटतं. किंवा मुलं काहीही करत असली तरी ते त्यात सतत डोकवायला येतात. त्यामुळे मुलांना त्यांचा असा वेळ मिळत नाही. भारतात मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या प्रत्येक हालचालींचा निर्णय म्हणजेच महाविद्यालय निवडण्यापासून ते लग्नापर्यंतचे सगळे निर्णय हे पालकांचे असतात. मुलांना इथे गृहीत धरलं जातं. आता आता कुठे हे सगळं काही प्रमाणात बदलत आहे.

मुलांमध्ये आणि पालकांमध्ये एक प्रकारे मैत्री भाव निर्माण होऊन एका विषयावर दोघांमध्ये चर्चा होऊन एक अंतिम निर्णय त्यातून निघत आहे. हे आता होत आहे आणि हीच आजच्या काळाची गरज आहे.मुलांना प्रायवसी देणं म्हणजे नक्की काय करणं या प्रश्नाचं साधं उत्तर म्हणजे त्यांना त्यांचा त्यांचा वेळ देणं. आपण हे ऐकतो ना की प्रत्येक माणसाला ही आत्मज्ञानाची गरज असते. माणूस आपल्याच काही चुकांमधून शिकून त्यावर विचार करतो. मात्र बरेचदा अनेक पालक मुलांच्या बाबतीत हीच प्रक्रिया घडू देत नाहीत. तू राहूदे अजून लहान आहेस!

या गोष्टीत तू पडू नकोस तुला कळणार नाही. किंवा तू आधीच ठरवून कसा मोकळा झालास. आम्ही अजून जिवंत आहोत.या आणि अशा प्रकारच्या गोष्टी पालकांकडून ताबडतोब सुनावल्या जातात. मुलं मोबाईलवर बोलत असली तर वारंवार तिथे घिरट्या घालायच्या किंवा त्यांचं बोलणं कान लावून ऐकायचं, ते आसपास नसताना त्यांचा मोबाइल चेक करायचा. त्यांच्यावर नजर ठेवायची.

मुलं कुठे मित्र किंवा मैत्रिणी बरोबर बाहेर जात असतील तर सतत कोण? कुठे? कोणाबरोबर? कशाला अशा चौकशा करायच्या. आपलं मूल त्याच्या खोलीत शांतपणे काही ऐकत असेल किंवा वाचत असेल तर संशयाने वारंवार त्यांच्या खोलीत जाऊन ते काय करतायत हे पहायचं म्हणजे आपणच मुलांना दिलेल्या संस्कारावर अविश्वास दाखवण्यासारखं नाही का?

पण काही पालक असेही असतात की ते आपल्या मुलांना काही निर्णय स्वतः घेण्यास अडवत नाहीत किंवा त्यांच्या अनेक गोष्टीत ते त्यांना स्वतःचा वेळ देतात. स्वतः हस्तक्षेप करत नाहीत. आज असेही पालक आहेत जे आपल्या मुलांना जर एखादी गोष्ट करायची असेल. मुलांना स्वतःवर त्या बाबत विश्वास असेल तर त्यांच्या वर अतिदबाव न आणता त्यांना त्या गोष्टी करू देतात. उदारणार्थ जर आपल्या मुलांना चित्रकलेची आवड आहे त्यांना एखादा कोर्स करायचा असेल ते स्वतः त्यामध्ये काही करियर करू इच्छित असतील तर कधी कधी डोळे झाकून त्यावर विश्वास दाखवावा.

मुलांना निर्णय घेऊ न देण्याच्या स्वभावामुळे मूलं आपल्यापासून दुरावण्याची शक्यता जास्त असते. काही गोष्टी मुलं तुम्हाला सांगण्याचा विचार करत असतीलही पण तुम्ही त्यांच्या निर्णयावर नकार द्याल किंवा त्यांच्यावर स्वतःचा निर्णय थोपवाल यामुळे ही मुलं तुम्हाला काही गोष्टी सांगत नाहीत. तुमच्यापासून ते लपवून ठेवतील. हे सगळ्याच पालकांच्या बाबत लागू होतं असं नाही. अनेक पालक आपल्या मुलांना शक्य तितकं स्वातंत्र्य आणि शक्य तितकं मुलांनी घेतलेल्या निर्णयाला पाठबळ देतात. मुलांशी सतत चांगला संवाद ठेवतात. त्यांच्यावर आपलं असणं लादत नाहीत. किंवा सतत उपदेशाचे डोस पाजत नाहीत. यामुळे मुलंही त्यांच्यापासून स्वतःची अशी वेगळी प्रायव्हसी हवी अशी तक्रार करत नाहीत. मुलं आणि पालक यांच्यात प्रायव्हसी बाबत जर मोकळा संवाद घडला तर मुलांना त्यांच्या चूका आणि पालकांना त्यांच्या चूका लक्षात येऊ शकतात. परदेशात असं आहे आणि आपल्याकडे असं आहे हे म्हणण्यापेक्षा अनेकदा आपण आपल्या संस्कारांना जपूनही काही गोष्टी आपल्या नात्याला मोकळीक देऊन ते टिकवू.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button