लहान वयात मुलांना कोणतीही नवीन गोष्ट शिकवणे सोपी जाते. तसेच त्यांना ते पटकन आत्मसात देखील करता येते. मग ते पोहणे असो किंवा बुटांची लेस बांधणी असो. परंतु हे शिकवत असताना शिकवण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. ज्यामुळे मुलं त्रास न देता हे सर्व चांगले शिकू शकतील.
कोणत्या आहेत त्या योग्य पद्धती? | How does your child learn best examples
पद्धत सांगा
लहान मुलांना किचन सेटसोबत खेळायला प्रचंड आवडते त्यामुळे या खेळाद्वारे त्यांना स्वयंपाक घरातील पद्धती बद्दल सांगा. जसे जेवण कसे वाढावे? चमचा कसा वापरायचा? तसेच आपल्या मुलांना आपण भाज्या आणि फळांच्या नावाबद्दल ही माहिती देऊ शकता. तसेच डॉक्टर सेटच्या माध्यमातून मुलांना प्राथमिक उपचारांची माहिती देऊ शकता. मुलं ही खेळ खेळून शिकतील आणि त्यांना त्यामुळे कंटाळा येणार नाही.
पोहणे शिकवा
लहान मुलांना पाण्याशी खेळायला खूप आवडते. त्यामुळे आंघोळ करताना त्यांच्या डोक्यावरून पाणी घाला. त्यामुळे मुलांच्या मनातील पाण्याबद्दलची भीती दूर होईल. त्यानंतर मुलांना एक खोल आणि मोठ्या टबमध्ये आंघोळ घाला आणि त्यांना पोटावर झोपून ठेवा. त्यामुळे ते हातपाय हलवायलाही शिकतील.
फित बांधणे
लहान मुलांना शाळेत जाताना, बूट घालणे, त्यांच्या फिती बांधणे यासाठी खूप वेळ लागतो. ही सर्व कामे त्यांना खेळातून शिकवता येतात. त्यामुळे बाजारात खेळण्यातील बुटांच्या मदतीने फित बांधायला शिकता येते.
हे सुध्दा वाचा – आपल्या मुलांना वस्तीगृहात ठेवण्यापूर्वी घ्या ही काळजी
आर्थिक साक्षरता
लहान मुलांची आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी खेळण्याचे बनावट पैसे कामी येऊ शकतात. मुलांना हिशोब शिकवण्यासाठी खेळणी असलेली दुकान सुरू करता येईल. आपल्या लहान मुलांना तुम्ही दुकानदार बनवून तुम्ही ग्राहक बना. त्यामुळे त्यांना नाणी आणि नोटा ओळखण्यास मदत होईल आणि त्यांना त्यांची मजाही येईल.
संतुलन साधने
लहान मुलांना संतुलन साधने खूप कठीण वाटते. त्यामुळे नेहमी त्यांना आपल्या आयुष्यातील सकारात्मक बाबींचा प्रवास समजून सांगावा. तसेच लहान खेळातील संतुलन राखणाऱ्या खेळण्या घेऊन त्यांना त्या प्रत्यक्ष समजून सांगाव्यात.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.