एक मिस्ड कॉलने फोन होतोय हॅक? जाणून घ्या सविस्तर प्रकरण..

सध्या केवळ एका मिस्ड कॉलने फोन हॅक करण्याचे प्रकार सुरु झाले आहे. हे कसे शक्य होते? तर मिस्ड कॉल येताच युजरच्या नकळत त्याच्या डिव्हाईसवर स्पायवेअर ताबा मिळवते. यात युजरला कोणतीही कृती करावी लागत नाही. हा हल्ला रोखणे जवळपास अशक्य आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात..

हल्ल्यात काय-काय चोरीला जाऊ शकते? | How can a phone be hacked by a missed call?

  • डिव्हाईसमधील जवळपास सर्व माहिती.
  • फोनवर सुरु असलेले संभाषण.
  • ईमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आदींवरील पोस्ट आणि माहिती.
  • जीपीएस लोकेशन, व्यक्ती किती वेगाने चालते आहे?
  • कॉन्टॅक्ट नंबर्स, युजर नेम, पासवर्ड, नोट्स, डाक्युमेंट्स, फोटो, व्हिडिओ, साऊंड रेकॉर्डिंग.
  • काही स्पायवेअर डिव्हाईस कॅमेरा तसेच मायक्रोफोन चालू करून तुमच्या हालचाली पाहू व ऐकू शकतात.

असे हल्ले कुठे झाले आहेत?

सध्या जगभरात अशी हेरगिरी सुरु आहे. इस्रायलच्या एनएसओ या कंपनीचे ‘पेगसस’ हे स्पायवेअर यासाठी वापरले गेले आहे. कंपनीने या स्पायवेअरचा वापर केला आहे जे मिस्ड कॉलद्वारे फोनमध्ये पोहचवले जाते, असा दावा यात करण्यात आला आहे.

हल्ल्याची खातरजमा कशी करावी?

सध्या यासाठी एकच मार्ग आहे. यात युजरचा फोन किंवा डिव्हाईस फॉरेन्सिक तपासणीसाठी कॅनडा येथील लॅबमध्ये पाठवावी लागतो.

फोन हॅक होण्यापासून कसे वाचाल?

  1. फोनमधील सॉफ्टवेअर सतत अपडेट करावे. यासाठी सेटिंगमध्ये अ‍ॅटोमॅटिक मोड अ‍ॅक्टिव्हेट करा.
  2. हँडसेट 5 वर्षापेक्षा जास्त काळ वापरणे टाळा. कारण जुन्या फोनवर असा हल्ला होण्याची अधिक शक्यता असते.
  3. डिव्हाईसवर असा पासवर्ड ठेवा ज्याचा सहजपणे अंदाज बांधता येणार नाही. उदा. जो तुमचे नाव, आडनाव किंवा जन्मतारीख आदींशी संबंधित नसावा.
  4. जिथे शक्य असेल तिथे टू फक्टर ऑथेटिफिकेशन वापरा. यामुळे अनोळखी व्यक्ती तुमचे डिव्हाईस कोणत्याही कामासाठी हाताळू शकणार नाही.
  5. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंक तसेच अटॅचमेंटवर क्लिक करू नका.
  6. डिव्हाईसवर डिसअपिअरिंग मेसेजेस हा ऑप्शन अ‍ॅक्टिवेट करा. यामुळे न वाचलेले मेसेज काही काळाने आपोआप डिलीट होतील.

Note :- Technology बद्दलच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईट आणि सोशल मीडिया ॲप्स Facebook, Instagram आणि sharechat ला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button