मुलांना दुधातून अर्धा चमचा मध द्या, अन्य टॉनिकची कसलीच गरज नाही | Honey Benefits in Marathi

मधाच्या नियमित सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. त्यामुळे लठ्ठपणा घालवायचा तर मधासारखे निसर्गाने दुसरे मधुर औषध नाही. ते शरीरातील पेशींनाही बळकटी देईल आणि दुसऱ्या बाजूला अनावश्यक चरबीचाही नाश करून शरीर सुडौल करील. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी ग्लासभर पाण्यात एक लहान चमचा लिंबूरस मिसळा. त्यात एक ते दीड चमचा मध मिसळून ते मिश्रण प्या.

मध कोणाला माहीत नाही ? वैद्यराज आपली औषधे देताना ती ? मधातून मिसळून देण्याची शिफारस करतात. मध शरीरातील नाड्यांना साफ करणारा आहे. बुद्धीचे तेज वाढविणारा आहे. आतड्यातील मलावरोध दूर करणारा आहे स्फूर्ती व चैतन्य प्रदान करणारा आहे.मधाचे औषधी गुण विलक्षण आहेत.

प्राचीन काळापासून भारतीयांना मधातील अद्भुत व विलक्षण गुणांची माहिती होती. सुश्रुताने मधाचे वर्णन हृदय व अस्थिभंग सांधणारा, वाजीकरण करणारा आणि त्रिदोष दूर करणारा असे केले आहे.आयुर्वेदाच्या मते मधाचे आठ प्रकार आहेत. माक्षिक, भ्रामर, क्षौद्र, पौतिक, छान्य, आर्ध्य, औद्रदालिक व दाल असे आठ ते प्रकार होत. मध गोळा करणाऱ्या मधमाशांच्या आणि वनस्पतींच्या प्रकाराप्रमाणे मधाच्या रंगात, बासात, स्वादात आणि गुणधर्मात फरक पडतो. वृक्ष व फुलांनी बहरलेल्या थंड प्रदेशातील मध उत्तम समजला जातो. उष्ण प्रदेशातील मध उत्तम समजला जातो. सामान्यत: मध दोन प्रकारचा असतो. एक माखियू आणि दुसरा कृतियू सर्वच मध गुणकारी असतो.

मधामध्ये ‘बी’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. मध योगवाही आहे. योगवाही म्हणजे विविध औषधांबरोबर मधाचे सेवन केल्याने गुण लवकर येऊन रोगमक्ती होते! यामुळेच मध अनेक औषधांमध्ये अनुपान म्हणून वापरला जातो.मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होऊन रक्तातील फिकटपणा दूर होतो. श्वसनसंस्थेतील विकारांवर मध गुणकारी आहे. त्याचबरोबर त्वचाविकारावरही मध उपयुक्त आहे. साखरेमुळे मधुमेह जडतो आहे. असे मानणाऱ्यांनी मधाचे सेवन साखरेऐवजी वैद्याच्या सल्ल्याने करावे. मधुमेह आटोक्यात येईल आणि गोडीही मिळेल. शिवाय मधुमेहामुळे उद्भवणारा थकवा येणार नाही.

मुलांना दुधातून अर्धा चमचा मध द्या, अन्य टॉनिकची कसलीच गरज नाही | Honey Benefits in Marathi

अशक्त मुले सशक्त बनवा

ज़ी मुले अशक्त आहेत, त्यांना दुधातून एक चमचा मध मिसळून द्या. मुले सशक्त होतील. अन्य टॉनिकची बिलकूल गरज नाही.हृदयविकार जडलेल्यांनी दररोज दोन ते चार तोळे मध घेतल्यास हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि हृदयविकाराशी सामर्थ्य लाभते. मुकाबला करण्याचे

वजन कमी करण्यासाठी

मधाच्या नियमित सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. त्यामुळे लठ्ठपणा घालवायचा तर मधासारखे निसर्गाने दुसरे मधुर औषध नाही. ते शरीरातील पेशींनाही बळकटी देईल आणि दुसऱ्या बाजूला अनावश्यक चरबीचाही नाश करून शरीर सुडौल करील. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी ग्लासभर पाण्यात एक लहान चमचा लिंबूरस मिसळा. त्यात एक ते दीड चमचा मध मिसळून ते मिश्रण प्या. हा प्रयोग नियमित आणि दीर्घकाळ करा. हमखास वजन कमी होते. श्रद्धा आणि सबुरीने करा आणि यश मिळवा.

उत्तम मध कसा ओळखावा ?

मध जितका जुना तितका गुणकारी मध नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवावा. पत्र्याच्या डब्यात कदापि साठवू नये. तो काळा पडतो आणि घाण वास करतो.मध अस्सल की बनावट आहे, हे ओळखण्यासाठी युक्ती साधी व सोपी आहे. मधाचा थेंब पाण्यात सोडला की सरळ पाण्याच्या तळाशी जाऊन बसतो. तो मध अस्सल. अस्सल मध मिसळलेल्या कोणत्याही खाद्यपदार्थाला कुत्रा कधीही शिवत नाही. मधात कापसाची वात भिजवून पेटविली तर ती आवाज न करता अथवा न तडकता पेटत राहते.

सर्दी आणि मध

सर्दीचा विकार हा विशिष्ट काळी 70 टक्के लोकांना हमखास होतो. सर्दीवर आयुर्वेदिक औषधे भरपूर आहेत. विविध कंपन्यांची औषधे वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आहेत. परंतु साधा व सोपा उपचार म्हणजे 1 चमचा आल्याच्या रसात 1 चमचा मध मिसळून दिवसातून 3 वेळा प्यायल्याने सर्दी बरी होते. जठराग्नी प्रदीप्त होऊन भूकही लागते.खोकला हा अधुनमधून उद्भवणारा विकार त्यावर मात करायची तर दिवसातून चार वेळा मधाचे चाटण घ्या. दुसरा उपाय असा की, एक चमचा अडुळशाचा रस, अर्धा चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध हे मिश्रण दिवसातून 3 वेळा घ्या.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button