उन्हाळ्यात आपण काहीतरी थंड पेय किंवा शरीराला तसेच मनाला थंडावा देणाऱ्या पदार्थाच्या शोधात असतो आणि नेमका आपल्याला बर्फाचा गोळा बनवणारा गोळेवाला दिसला तर ती आपल्यासाठी पर्वणीच ठरते. तर या आंबट-गोड, चटपटीत आणि रंगीबेरंगी दिसणाऱ्या बर्फाच्या गोळ्यामागची कहाणी आजच्या पोस्ट मध्ये जाणून घेऊया.
बर्फाचा गोळा खाण्याची सुरुवात कधी झाली? | History of ice gola in marathi
बर्फाच्या गोळयाला गारेगार, चुसकी, कांडीबर्फ, बर्फाचा गोळा यापैकी तुम्ही काय म्हणता? शाळा, कॉलेजच्या बाहेर हमखास असणाऱ्या बर्फाच्या गोळ्याला आपण देशी समजतो पण त्याविषयी अनेक संस्कृती आणि दंतकथांचा समावेश असलेला इतिहास आहे. भारता व्यतिरिक्त उत्तर अमेरिका, हवाई, टेक्सास, उत्तर मेक्सिको, मलेशिया, सिंगापूर, जपान याठिकाणी बर्फाचा गोळा खाल्ला जातो. प्रत्येक देशांनुसार बर्फाचा गोळा बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे.
या बर्फाच्या गोळ्याचा शोध कसा लागला यामागची कथा बर्फाच्या गोळ्याइतकीच रंगीबेरंगी आणि तितकीच मनोरंजक आहे. काहींच्या मते ख्रिस्त जन्मानंतर इ.स. 794 ते 1185 या जपानी हेयान काळात बर्फाच्या गोळयाचा शोध लावला गेला. जेव्हा बर्फ फार दुर्मिळ मानला जायचा तेव्हा बर्फ पर्वतावरून खाली आणला जाई आणि तो हिमरो गुहेत साठवला जात असे. समाजातल्या फक्त प्रतिष्ठित लोकांना तो मिळत असे. जपानी लोक हवाईयन बेटावर स्थलांतरित झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत हवाईयन बर्फाचा गोळा आणला. लोकप्रिय असलेलल्या हवाईन बर्फाच्या गोळ्याचा कोन बनवून त्यासोबत आइसक्रीमचा स्कूप दिला जातो.
उत्तर अमेरिकेत प्रसिद्ध असणाऱ्या बर्फाच्या गोळ्याला ‘स्नो बॉल’ बोलले जात असून तो दोन प्रकारे बनवला जातो. एक म्हणजे किसलेल्या बर्फापासून बनवलेला गोळा तर दुसऱ्या प्रकारात तो जाडसर कुरकुरीत किसलेल्या बर्फापासून बनवून त्याला कोनाचा आकार दिला जातो. तर टेक्सास, उत्तर मेक्सिको मध्ये याला वेगवेगळी नावे आहेत. ‘रास्पा’ नावाचा प्रकार लिंबू आणि मिरची पावडरसह अनेक चवींमध्येही मिळतो. ‘ऐस कचांग’ हे मलेशिया आणि सिंगापूरमध्ये विकल्या जाणाऱ्या लोकप्रिय बर्फाच्या गोळ्याचे नाव आहे. पूर्वी हे लाल सोयाबीन सोबत दिले जायचे. आता त्यावर फळांचे तुकडे टाकून दिले जाते. जपानमध्ये 19 व्या शतकाच्या उत्तरार्धातही असाच एक पदार्थ होता ज्याला ‘काकीगोरी’ म्हणून ओळखले जाते.
पूर्व डल्सचे रहिवाशी असणाऱ्या बर्ट नामक व्यक्तीने 1919 च्या काळात बर्फाच्या कोनांची निर्मिती झाल्यावर टेक्सास स्टेट फेयर मध्ये त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी क्रश करण्याचे मशीन घेतल्यावर 1950 च्या दशकापर्यंत दरवर्षी जवळजवळ एक दशलक्ष बर्फाचे कोन विकले जात होते. औद्योगिक क्रांतीच्या काळात पारंपरिक बर्फाच्या कोनांपेक्षा जास्त सरबत असलेले व किसून बनवलेले बर्फाचे गोळे आले. पर्शियामार्गे 16 व्या शकाच्या सुरवातीस जेव्हा मुघल भारतात आले तेव्हा इथली गरमी त्यांना सहन होत नव्हती. यावर उपाय म्हणून त्यांनी थंड प्रवृत्ती असलेली द्राक्ष, टरबूज सारखी फळे खाण्यास सुरुवात केली पण त्यावर त्यांचे समाधान झाले नाही.
मग हिमालयात जाऊन कसोली जवळच्या ‘चुरी चाँदनी धार’ नावाच्या डोंगरावरून बर्फ आणला जाऊ लागला. इसवी सन 1590 च्या सुमारास ‘आईने अकबर’ मध्ये लिहिलेल्या नोंदीनुसार बर्फाने भरलेल्या बोटी त्यावेळची राजधानी असलेल्या लाहोर मध्ये आणल्या जायच्या. अशारीतीने बर्फ भारतात येऊ लागला आणि बर्फापासून बनवलेले पदार्थ भारतामध्ये बनवले जाऊ लागले. उत्तर अमेरीका, जपान, चीन मध्ये बर्फाचा गोळा खाल्ला जायचा. चीन आणि पर्शिया यांच्यातल्या व्यापारामुळे तो पर्शियामध्ये पोहचला आणि पर्शियामधून मुघलांद्वारा भारतात आला. बर्फाच्या गोळ्यांमध्ये किसलेल्या बर्फाचा गोळा जसजसा जास्त लोकप्रिय झाला तसा तो भारतासहीत जगभरातील रस्त्यांवरील दुकानांमध्ये आणि रस्त्यांवरही दिसू लागला.
2008 साली ‘गोगोळा’ हे फक्त गोळा असलेले आऊटलेट मुंबईमध्ये सुरू झाले आणि गोळ्याला हायफाय रूप मिळाले. त्यांनी काही निवडक बर्फाच्या गोळ्याचे प्रकार बाजारात आणले. अलीकडच्या काळात बर्फाच्या गोळा बनवण्याच्या प्रकारत आवडी-निवडी आणि स्वच्छता यांना विचारात ठेवून बदल केले आहेत. जस की, मिनिरल वॉटरच्या बर्फापासून बनवलेला गोळा, ब्लु लोगण फ्लेवर्स गोळा असे तत्सम प्रकार. ही पोस्ट वाचून जर आपल्याला बालपणाची आठवण ताजी झाली असेल तर नक्की गोळा खा. आणि पोस्टला नक्की शेअर करा.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.