कारल्याची भाजी खायची म्हटलं कि अनेकांची नाके मुरडली जातात. अनेकांना ही भाजी अजिबात आवडत नाही. कारलं कडू असल्याने त्याची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारलं खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. मधुमेह रुग्णांसाठी कारलं अतिशय फायदेशीर आहे. तसेच दमा,पोटदुखी या आजारावर हा रामबाण उपाय आहे.
रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते.
कारल्याचा वापर एका नैसर्गिक स्टेरॉइडचे रूपात केला जातो कारण यात कॅरेटिन नावाचं रसायन अधिक प्रमाणात असतं. याचे सेवन केल्याने रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते.
कारलं हे किती पोषक आहे.
कारल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल जितकी नियंत्रित केली जाते तितकी शरीराला पोषक तत्त्वे मिळतात. त्यासोबतच कारल्यामध्ये तांब,विटामिन बी,यांसारखे तत्व असतात. यामुळे रक्त साफ आणि स्वच्छ राहत आणि किडनी सुद्धा निरोगी राहते.
आरोग्यदायी फायदे
- कारण शरीरात निर्माण झालेल्या विषारी घटक तसेच अनावश्यक फॅटसना दूर करतो. तसेच लठ्ठपणा दूर करण्यासह सहाय्यक ठरते.
- कारल्याचा रस पिल्याने पोटातील जंत दूर होतात. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे आणि ॲनिमिया दूर करतो. कारल्याचा रस पिल्याने वात-पित्त यासारखे दोष नाहीसे होतात.
- जर सांधेदुखीचा त्रास असेल तर कारल्याची भाजी खाल्ल्याने दूर होतो.
- त्वचारोग कुष्ठरोग आणि मुळव्याध असल्यास त्या ठिकाणी कारल्याचा लेप लावावा ही प्रतिक्रिया महिनाभर करावी.
- मधुमेही रुग्णांसाठी कारलं हे एक वरदान आहे.
- कफचा त्रास असलेल्यांना कारलं खाल्याने आराम मिळतो.
- दमा असल्यास बिना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो.
- पोटात गॅस ची समस्या किंवा अपचन झाले असेल तर कारलं खाल्याने आराम मिळतो.
- कारल्याचा रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
- तोंडात फोड आल्यास कारल्याच्या रसाने गुळण्या करा याने आराम मिळेल.
Note – मित्रांनो, तूम्ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय ही कृती करू नका.आशा करतो कीHealth Benifit of Bitter Melon in marathi माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर. आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही सोशल मीडियावर शेअर जरूर करू शकता.