नमस्कार मित्रांनो आज आपण शेंगदाणे खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतं.
शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे.. | Health Benefits Of Peanuts In Marathi
शेंगदाण्यांमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात.त्यामुळे शेंगदाणे प्रोटीनसाठी सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत मानले जाते. मुठभर शेंगदाणे मध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज,कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यामध्ये विटामिन इ, के आणि बी6 हे भरपूर प्रमाणात असतात. शेंगदाणे खाण्याचे अजून कोण कोणते फायदे आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
- शेंगदाण्याध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त असल्यामुळे ते हाडांसाठी खूप चांगले असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
- शेंगदाण्यामध्ये अँटीऑक्साईड भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शेंगदाने नियमित खाल्याने पोटाचे आजार आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. शेंगदाणामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- शेंगदाण्याची प्रोटीन,फायबर,खनिज व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्यांचे सेवनाने त्वचा चांगली दिसते.
- जेवण झाल्यानंतर 50 किंवा 100 ग्राम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास अन्नपचनास सुद्धा मदत होते. विशेष म्हणजे रक्ताची कमतरता भासत नाही.
- फार कमी लोकांना हे माहित आहे की शेंगदाणे खाल्ल्यामुळे तुमचा सर्दी-खोकला पासून बचाव होऊ शकतो. एवढेच नव्हे तर शेंगदाणे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला उष्णता आणि उर्जा मिळते. याशिवाय शेंगदाणे तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असते.
- गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने बाळाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.