पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे | Health benefits of mint

नमस्कार आज आपण पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. पुदीन्याची चटणी सर्वांना आवडतेच. स्वाद देण्याव्यतिरिक्त पुदीन्याची अनेक वैशिष्ट्यही आहेत. पुदीन्याची पानं हे अन्नाचं पचन करण्यासाठी फायदेशीर आहे.पुदिनाच्या पानांमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असते. शिवाय यामध्ये प्रोटीन आणि गूड फॅटही असतात. तसंच व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्सच्या प्रमाणामुळे शरीर आरोग्यदायी राखण्यास मदत होते. 

पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे | Health benefits of mint

इतकंच नाहीतर पुदीन्याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुदिना रक्ताच्या पीएचला अ‍ॅसिडिक होऊ देत नाही. त्याचप्रमाणे पुदीना हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा करण्यास फायदेशीर ठरतो. अजून कोणते फायदे आहेत खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर

पुदिन्याच्या वापरामुळे नाक, गळा आणि फुफ्फुस यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे पुदिनाचे सेवन केल्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो.घशामध्ये जर जळजळ होत असेल तर त्यावरही पुदीना उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यास मदत

वजन नियंत्रित करण्यासाठी पुदिना उपयुक्त असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुदिनामुळे अन्न चांगल्या पद्धतीने पचतं. उत्तम मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यास फायदेशीर असतो. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर पुदीन्याचं सेवन करा.

तोंडाच्या आरोग्यासाठी गुणकारी

पुदिनामुळे तोंडाचं आरोग्य उत्तम राहते. पुदिना तोंडाच्या आत वाढणाऱ्या बॅक्टेरियांना प्रतिबंध करतो. इतकंच नव्हे तर दातांवरील डाग दूर करण्यास पुदिनाची मदत होते. पुदिनाची पानं चावल्याने तोंडाला दुर्गंधी येत नाही.

इम्युनिटी वाढते

कोरोनाच्या कठीण काळात संसर्ग रोखण्यासाठी शरीरात चांगली इम्युनिटी पॉवर असण्याची गरज आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पुदिन्याच्या चटणीचा आहारात समावेश करा.रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने शरीरातील विविध प्रकारचे आजार दूर होतात.

पुदिनाचे आणखी काय फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • पुदिन्याचा वापर चटणीमध्ये केलेला आपण नेहमीच पाहतो. अपचनावर पुदिन्याचा फार उपयोग होतो. पुदिन्याच्या रोपांना एकप्रकारचा सुवासिकपणा असतो. प्रत्येकाच्या घरी पुदिना असणे आवश्यक आहे ते त्याच्यातील गुणधर्मामुळे.
  • पुदिना व तुळस यांचा काढा करून प्यायल्यास रोज येणारा ताप बरा होतो.. तर या काढ्यामध्ये मिरे व आले घालून घेतले असता पोटातील वायूचे प्रमाण कमी होते. भूकही चांगली लागते.
  • कांजण्या झाल्या असता राज तुळस, काळी तुळस व पुदिना यांचा काढा करून व त्यात खडीसाखर घालून प्यावा. फायदा होतो.
  • तोंडाला चव नसणे, अपचन, पोटात वायूचा गुबारा धरणे यांवर ताजा पुदिना, खारीक, मिरे, हिंग, जिरे, काळी द्राक्षे, सैंधव यांची वाटून केलेली चटणी त्यात थोडा लिंबाचा रस घालून खावी.
  • मुदतीचा ताप किंवा थंडी वाजून येणारा ताप आला असता पुदिना व आल्याचा काढा करून प्यायल्याने घाम येऊन ताप उतरतो.

हे सुध्दा वाचा:मिठाचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • आतड्यांचे विकार व पोटदुखीचा त्रास असलेल्यांनी पुदिन्याचा ताजा रस मधात घालून प्यावा.
  • पुदिन्याच्या रसाच्या सेवनाने उलटी, अतिसार, वायू धरणे व कृमीविकार नष्ट होतात.
  • सर्दी झाली असता पुदिन्याचा ताजा रस किंवा अर्क प्यावा.
  • चमचाभर आले व पुदिन्याच्या रसात सैंधव घालून प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
  • नायटा झाला असेल तेथे पुदिन्याचा रस वरचेवर चोळावा.
  • सर्दी झाल्यास पुदिन्याच्या रसाचे थेंब नाकामध्ये सोडावेत.
  • पुदिन्याचा रस रात्री झोपताना चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर तजेला येतो.
  • ओकारी येईल असे वाटणे, मळमळणे यांवर पुदिना व तुळशीची तीन-चार पाने चावून खावीत.
  • तापामुळे अंगात अशक्तपणा जाणवत असल्यास पुदिन्याचा पानांचा चहा करून घ्यावा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ