जंतुनाशक व बुद्धिवर्धक पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Guava Benefits in Marathi

पेरू सात्विक व बुद्धिवर्धक असल्यामुळे बुद्धिजीवी लोकांनी विशेषतः सतत बुद्धिनेच काम करणाऱ्यांनी पेरू खायलाच हवेत. ज्याच्या मेंदूत उन्माद चढतो, अशा रुग्णांनी पेरूचे नियमित सेवन करावे. युनानी वैद्य उन्माद चढलेल्या रुग्णाला खास पेरू खायला देतात. उन्माद झालेल्या रोग्याला तो खाऊ शकेल तेवढे पेरू खायला देतात. तसेच भ्रमिष्टपणा, मुर्च्छा येणे या मानसिक विकारांत पेरू फारच लाभदायक आहे.

जंतुनाशक व बुद्धिवर्धक पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे |Guava Benefits in Marathi

हिवाळ्यात पेरू पुष्कळ येतात. पेरू खाल्ल्यामुळे सर्दी होते, खोकला होतो, असा सर्वसामान्य लोकांमध्ये निव्वळ गैरसमज आहे. पेरू पित्तनाशक आहे. तो योग्य प्रमाणात खाल्ला तर औषधासारखा उपयुक्त आणि गुणवान आहे. कारण आवळा सोडला तर पेरूमध्ये सर्वात अधिक प्रमाणात ‘क’ जीवनसत्व आहे.भारतात अलाहाबाद, बनारस, लखनौ, मिर्झापूर, धारवाड आणि नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड होते.आज आपण पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत.

अलाहाबादचे सर्वोत्कृष्ट पेरू

अलाहाबादची अमरूद ही पेरूची जात सर्वोत्कृष्ट समजली जाते.गुजरातमध्ये धोकला, बडोदा व आजुबाजूच्या भागात तसेच मेहसना जिल्ह्यातील गोयादिया येथे उत्तम प्रकारचे पेरू होतात. सौराष्ट्रात भावनगर आणि महुवा या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पेरू होतात.जीर्ण मलावरोध असलेल्यांनी पेरू अवश्य खावा. अशा लोकांसाठी पेरू म्हणजे निसर्गाने दिलेले शंभर नंबरी औषध आहे. अशा रुग्णांनी रात्री निजण्यापूर्वी एक मोठा पेरू खावा.

बुद्धिवर्धक पेरू

पेरू सात्विक व बुद्धिवर्धक असल्यामुळे बुद्धिजीवी लोकांनी विशेषत: सतत बुद्धिनेच काम करणाऱ्यांनी पेरू खायलाच हवेत. ज्याच्या मेंदूत उन्माद चढतो, अशा रोग्यांनी पेरूचे नियमित सेवन करावे. युनानी वैद्य उन्मादामुळे रोग्याला खास पेरू खायला देतात. उन्माद झालेल्या रोग्याला तो खाऊ शकेल तेवढे पेरू खायला देतात. तसेच भ्रमिष्टपणा, मुर्च्छा येणे या मानसिक विकारांत पेरू फारच लाभदायक आहे.

जेवल्यानंतर पेरू खा !

पोटात आग होते, जळजळ होते, घसा कोरडा पडतो, हातापायांच आणि डोळ्यांची रसरस होते, अशा तक्रारी असलेल्यांनी पिकलेला पेरू रो जेवल्यानंतर एक तासानंतर खावा. या तक्रारी दूर होतील. शस्त्रक्रियेतल्या जखमा लवकर भरतात !

मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जखमा भरून काढण्यासाठी आणि अशक्तप दूर करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक पेरू कुस्करून त्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा तूप घालून ते मिश्रण घ्यावे.

लहान मुलांचे टॉनिक

पेरू जंतूनाशक आहे. लहान मुलांना पेरू आणि मध यांचे मिश्रण दिल्यास लहान मुलांसाठी ते टॉनिक आहे. पेरूमुळे विषमज्वराचे जंतू मरतात हेही एक गुणवैशिष्ठ्य आहे.रंगपंचमीच्या दिवशी काही लोक भांग पितात. भांग जास्त चढली की माणसाचा मेंदूवरचा ताबा सुटतो आणि तो झिंगल्याचे चाळे करू लागतो. अशा वेळेस त्याला चांगले दोन चार पेरू खायला द्यावेत किंवा पेरूच्या पानाचा अडीच तोळे रस प्यायला द्यावा.भांगेची नशा उतरते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ