पेरू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Guava benefits in marathi

आतून पांढरे किंवा लालसर-गुलाबी दिसणारे अशा पेरुच्या दोन जाती आहेत. पेरूच्या फोडी करून आत मसाला, मीठ असे मिश्रण करून आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी खाल्ले असेलच. पेरूचा मुरांबा, जॅम, लोणचे तसेच त्याचे सरबतही केले जाते.

पेरू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Guava benefits in marathi

  • पेरूच्या नियमित सेवनामुळे मलावरोध दूर होतो. मलशुद्धी होते.
  • पेरू गोड, तुरट, वात-पित्तनाशक तसेच कफ-वीर्यवर्धक असतो. पेरू अतिशय थंडही असतो. पेरू स्वादिष्ट असला तरीही पचण्यास जड असल्या कारणाने जरा बेतानेच खावा. पेरूच्या अतिरेकी सेवनामुळे वायूचा प्रभाव वाढतो, जुलाब होतात व तापही येतो.

हे सुध्दा वाचा:आरोग्याच्या सुखदाय लाभासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

  • जेवल्यानंतर (दुपारी) तासा-दिडतासाने एक पेरू खावा, त्यामुळे शरीराला पोषक अशा सर्व घटकांची प्राप्ती होते.
  • पेरूच्या बिया वाटून त्यात पाणी, साखर घालून प्यावे. पित्तप्रकृती असलेल्यांना ते फायदेशीर ठरते.
  • पेरूच्या पानांचे पोटीस गळू झाले असेल तेथे बांधल्याने गळू लवकर पिकते.
  • डोळे दुखत असल्यास पेरूच्या पानांचे पोटीस डोळ्यांवर बांधावे. त्यामुळे डोळ्यांवर आलेली सूज, लाली आदी विकारामध्ये फायदा होतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ