अभिनेता गोविंदा यांच्या जीवना बद्दल माहिती | Govinda Biography in Marathi

गोविंद अरुण आहुजा अर्थात गोविंदा यांचा जन्म 21 डिसेंबर 1963 ला मुंबईतील विरार भागात झाला. त्यांचे वडील अरुण कुमार प्रख्यात अभिनेते होते व आई निर्मला देवी प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री होती.आपल्या 6 भावडातील गोविंदा हे सर्वात लहान सदस्य होते व त्यामुळे त्यांना ‘चिची’ हे नाव पडले.

गोविंदा यांचे शालेय शिक्षण हे मुंबई येथील अण्णासाहेब वर्तक विद्यालय वसई येथून पूर्ण केले. व पूढे वाणिज्य शाखेतून पदवी घेतली.गोविंदा यांचे अभिनय क्षेत्रातील पदार्पण हे 1986 साली प्रदर्शित झालेला ‘इल्जाम’ या चित्रपटातून झाले. हा चित्रपट 1986 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी एक यशस्वी सिनेमा होता. आपल्या पहिल्याच चित्रपटात गोविंदा यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

अभिनेता गोविंदा यांच्या जीवना बद्दल माहिती | Govinda Biography in Marathi

गोविंदा (Govinda) यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच कौटुंबिक सिनेमात काम केले. त्यातील त्यांचे घर घर की कहानी, जैसी करनी वैसी भरणी, घरांना, सच्चाई की ताकत, पाप को जलाकर राख कर दूंगा, हम, हे त्यांचे विशेष चित्रपट गाजले.

90 च्या दशक लागेपर्यंत गोविंदा यांनी आपल हिंदी चित्रपट सृष्टीतील स्थान बळकट केलं होत. तसेच आपल्यातील कलात्मक नृत्यशैलीमुळे,उत्तम संवादफेक तसेच जबरदस्त ॲक्शन सीनमुळे ते प्रेक्षकांना आवडू लागले. 90च्या दशकात त्यांनी आपला अभिनयाचा मोर्चा हा विनोदी चित्रपटाकडे वळवला. त्यातील त्यांचा पहिला चित्रपट ‘शोला और शबनम’ होता. या सिनेमाने तिकिट खिडकीवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानंतर त्यांची विशेष जोडी जमली ती म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यासोबत व त्यांच्या सोबतीला होते महान कलाकार ‘कादर खान’.

त्यानंतर या त्रिसूत्री जोडीने सिनेसृष्टीवर धुमाकूळ घातला. गोविंदा व कादर खान यांच्यातील अचूक विनोदी शैली,उत्तम संवादफेक व सोबतीला डेव्हिड धवन यांचे जबरदस्त मार्गदर्शन या जोडीने राजा बाबू,साजन चले ससुराल,आखे, हिरो नंबर, वन हसीना मान जाएगी, कुली नंबर 1, बडे मिया छोटे मिया, जोडी नंबर 1 यासारखे यशस्वी चित्रपट दिले. गोविंदा व डेव्हिड धवन या जोडीने 15 पेक्षा जास्त चित्रपटात सोबत काम केले आहे.

आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांनी सुमारे 150 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. गोविंदा त्यांना आपल्या चित्रपटातील अभिनयासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यापैकी एक म्हणजे, 12 वेळेस ‘फिल्मफेअर’ नामांकन व चार वेळेस ‘झी सीने’ पुरस्कार.

1999 च्या बीसीसी या वृत्तवाहिनीच्या सर्वेनुसार गोविंदा अभिनय क्षेत्रातील 10व्या क्रमांकाच्या प्रसिद्ध अभिनेता म्हणून गौरविण्यात आले होते. गोविंदा यांनी आपल्या ‘हद कर दी आपने’ या सिनेमात 6 रोल केले आहेत.

गोविंदा यांच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा विवाह 11 मार्च 1987 ला सुनिता यांच्यासोबत झाला. 2004 साली गोविंदा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व सोबतच लोकसभा निवडणूक लढली व जिंकली देखील. पण आपल्या राजकीय जीवनात ते फारसे यशस्वी झाले नाहीत व त्यांनी आपला मोर्चा परत चित्रपटाकडे वळवला.

आपल्या अभिनय क्षेत्रातील दुसऱ्या डावात गोविंदांनी पार्टनर, भागम-भाग, लाइफ पार्टनर यांसारखी यशस्वी सिनेमे दिलेत.आपल्या तीन दशकातील अस्मरणीय कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावरील गोविंदा नावाचे भारूड आजही कायम आहे.

Note: जर तुमच्याकडे Biography of Govinda in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Govinda information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button