बिजनेस करायचा आहे? मग ‘या’ सरकारच्या योजनेबद्दल तुम्हाला माहित आहे का? | Government schemes for business in marathi

आपल्यातील अनेक जणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. मात्र यामध्ये प्रामुख्याने पैसा आड येतो. कारण ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा पर्याय असल्यास आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर, ही पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या या खास योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्या योजनेअंतर्गत तुम्ही 50 हजार ते 10 लाखापर्यंत आर्थिक मदत घेऊन तुमच्या व्यवसाय चालू करू शकता.

ई मुद्रा कर्ज योजना या केंद्र सरकारच्या योजनेद्वारे तुम्ही आर्थिक मदत घेऊन व्यवसाय सुरू करू शकता

मुद्रा कर्ज योजना ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जाची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे या प्रकरणात तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते. मुद्रा कर्ज योजनेत तुम्हाला सिक्युरिटीशिवाय कर्ज मिळेल आणि तुम्हाला यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरण्याची गरज नाही.

केंद्र सरकारच्या मुद्रा लोन चा व्याजदर किती?

केंद्र सरकारच्या मुद्रा कर्जासाठी बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. मुद्रा कर्जासाठी साधारणपणे किमान व्याजदर 12 टक्के असतो. यामध्ये तीन प्रकारची कर्ज उपलब्ध आहेत. तुम्हाला पीएम मुद्रा कर्जाचे फायदे ती स्टेप मध्ये मिळू शकतात.

केंद्र सरकारच्या या योजनेत तीन टप्प्यात दोन उपलब्ध आहे

1. शिशू कर्ज योजना

केंद्र सरकारच्या शिशु कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळेल.

2. किशोर कर्ज योजना

केंद्र सरकारच्या किशोर कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपये पासून 5 लाख रुपयापर्यंत कर्ज ची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

3. तरुण कर्ज योजना

केंद्र सरकारच्या तरुण कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज घेता येते. विशेष म्हणजे ही योजना खास लहान उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली होती. त्या योजनेचा लाभ फळभाजी विक्रेते, लघुउद्योग कार्यशाळा, मशीन ऑपरेशन, अन्नसेवा युनिट, दुकान मालक येऊ शकतात.

हे सुध्दा वाचा:- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दर महिन्याला मिळते इतके उत्पन्न

या योजनेसाठी कर्ज कसे मिळवायचे?

तुम्ही हे कर्ज खाजगी बँका ग्रामीण बँका सरकारी बँक आणि सहकारी बँका यांच्याकडून घेऊ शकता आरबीआय ने 27 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 17 खाजगी बँका, 31 ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 सूक्ष्म वित्तनीय संस्था आणि 25 NBFC यांना मुद्रा कर्ज वाटप करण्यासाठी अधिकृत केले आहे.

कर्ज मिळविण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर https://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता. या वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही सर्व तपशील भरणे आणि महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर बँक शाखा व्यवस्थापक तुमच्या कामाची माहिती घेतात. व त्या आधारावर PMMY तुमचे कर्ज जारी करतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button